साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामपंचायत निकालानंतर टहाकळी ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन गट आपसात भिडल्याने तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागत असतांना तालुक्यातील टहाकळी येथे जालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटांकडून शाब्दीक वादानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन्ही गट भाजपाचे असल्याचे समजते. तर या घटनेत टहाकळी खुर्द येथील धनराज माळी (वय 30) असे मृत झालेल्ेया कार्यकर्त्याचे नाव असून चार ते पाच कार्यकर्ते जखमी असल्याचे वृत्त आहे.