मुक्ताईनगर, बोदवडमध्ये एकनाथ खडसेंनी गड राखला ! शिंदे-भाजपला धक्का

0
3

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी

जळगाव जिलह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपला गड राखला आहे. बोदवड तालुक्यात चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. तर एक ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता आली आहे. दुसरीकडे भाजप-शिंदे गटाला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही, तर मुक्ताईनगरातील कुऱ्हा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले.

तर उंचदा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्व नऊ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र सरपंच पदाचे उमेदवार शिंदे-भाजप गटाच्या पाठींब्यावर निवडून आले आहेत.जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातील ग्रामपंचायीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यातील दोन तर बोदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या. खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ग्रामपंचायतीकडे लक्ष होते. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार बी.सी.महाजन विजयी झाले. त्यांनी भाजप-शिंदे गटाचे भागवत राठोड यांचा पराभव केला. याठिकाणी १३ सदस्य राष्ट्रवादीचे तर चार सदस्य भाजप-शिंदे गटाचे निवडून आले आहेत. तर मुक्ताईनगर तालुक्यातील उंचदा ग्रामपंचायतीत सर्व नऊ सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडून आले आहेत. मात्र संरपंच पदाच्या उमेदवार भाजप-शिंदे गटाच्या वंदना दिपक गुल्हाणे निवडून आल्या आहे.

दरम्यान बोदवड तालुक्यात वडजी ग्रामपंचयात सरपंचपदी राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. निमावल, धोंडखेडा, चिंचखेडासीम, या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे, तर कोल्हाडी ग्रामपंचायतीवर कॉंगेसचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीने येथे बाजी मारली आहे.शिंदे-भाजप गटाला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे व जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांनी आपले वर्चस्व तालुक्यावर कायम ठेवले आहे. यामुळे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here