साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
कजगाव ता भडगाव येथील ग्रापंचायतचा निकाल मोठा धक्कायक लागला असून एकतर्फी परिवर्तन घडले आहे संपूर्ण तालुक्यात मोठ्या चर्चेत असलेल्या ग्रामपंचायत चा निकाल अपेक्षेपेक्षा धक्कादायक लागला असून रघुनाथ विठ्ठल महाजन यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिनेश सुमेरसिंग पाटील यांना तब्बल एक हजाराच्या मतधिक्याने पराभवाची धूळ चारली आहे तर सदस्य पदासाठी ही आघाडी घेतली
लोकनियुक्त सरपंच पदासाठी दिनेश पाटील व रघुनाथ महाजन यांच्यात ही काटेकीटक्कर पाहायला मिळाली यात विद्यमान सरपंचपती दिनेश सुमेरसिंग पाटील यांचे लोकसन्मान पॅनल व रघुनाथ विठ्ठल महाजन यांचे परिवर्तन पॅनल ची सरळ लढत झाली यात रघुनाथ महाजन यांच्या पॅनलचे सतरा पैकी तब्बल तेरा जागांवर विजय मिळवला तर विद्यमान सरपंचाचा लोकसन्मान पॅनल ला केवळ तीन जागा व एक बिनविरोध अश्या चार जागांवर समाधान मानावे लागले.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही उमेदवारांसह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यात लोकनियुक्त व सदस्य पदासाठीच्या दोन्हीकडील उमेदवारांनी विजयाचा दावा केला होता विजयाचे दावे प्रतिदावे शेवटपर्यंत सुरूच होते लोकनियुक्त सरपंच पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती ह्या चुरशीच्या लढाईत लोकनियुक्तचा उमेदवार अगदी थोडक्यात विजय किव्हा पराजय होईल अशी शक्यता असतांना मात्र तब्बल एक हजारांचा पडलेला फरक अनेकांना मोठा धक्का देणारा ठरला अनेकांचे दावे मतदारांनी प्रत्यक्षात फोल ठरवले आहेत त्यामळे एकतर्फी झालेल्या मतदानाने अनेकांचे डोळे विस्फाटून टाकणारा निकाल दिला आहे त्यामुळे रघुनाथ महाजन हे आता कजगाव च्या लोकनियुक्त सरपंच म्हणून विराजमान झाले आहेत तर रघुनाथ महाजन यांच्या पॅनलचे सदस्य म्हणून समाधान पवार. सत्यभामा चौधरी. मांगीलाल मोरे. सादिक मणियार. स्वीटी धाडीवाल. अक्षय मालचे. कविता महाजन. वैशाली धर्मराज हिरे . शोभा बोरसे. अंजनाबाई सोनवणे. शेख शफी मन्यार. पुंडलिक सोनवणे. पल्लवी पाटील.हे विजयी झाले आहेत तर दिनेश पाटील यांच्या लोकसन्मान पॅनल कडून विजय गायकवाड सीताबाई सोनवणे मंदाकिनी पाटील व एक बिनविरोध झालेल्या भीकुबाई पाटील हे विजयी झाले आहेत.
“””:काका पुतण्याच्या जोडीने घेतली आघाडी
दरम्यान कजगाव ग्रा प च्या निवडणुकीडे सर्वांचे लक्ष लागले असतांना त्याच धामधुमीत अनेकांचे लक्ष हे वार्ड क्रमांक तीन व वार्ड क्रमांक चार मधील शे शफी मणियार व सादिक मणियार ह्या दोघा काका पुतण्याच्या जोडीकडे लागले होते सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी प्रतिस्पर्धीला पराभवाची धूळ चारली शफी मणियार यांनी माजी उपसरपंच असलेले राहिम बागवान यांना पराभूत केले तर तर सादिक मणियार यांनी राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आरिफ मलिक यांनी भराभवाची धूळ होती त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत शे शफी व सादिक ह्या दोघा विजयी काका पुतण्याच्या जोडीचीच चर्चा झाल्याचे दिसून आले.
“”:पोलिसांचा तगडा बंदोबस्त
दरम्यान मोठ्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत लोकसन्मान पॅनलवर परिवर्तन पॅनलने बाजी मारल्याने परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यानी मोठा जल्लोष साजरा केला अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत रघुनाथ महाजन. दिनेश पाटील.वसुधा पाटील लालसिंग पाटील असे उमेदवार होते त्यामुळे ही निवडणूक अत्यंत दिमाखदार झाली सुरक्षेच्या करणास्थाव निकालाच्या दिवशी कजगावात मोठा पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्याचा आला होता यावेळी सपोनि चंद्रसेन पालकर कजगाव मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहाय्यक फौजदार छबूलाल , नागरे पोलीस नाईक नरेंद्र विसपुते, गणेश कुमावत , रवींद्र पाटील जळगाव हेडकॉटरचे चार कर्मचारी पाचोऱ्याचे दोन चाळीसगाव वाहतूक शाखेचे तीन बारा होमगार्ड असा तब्बल दोन अधिकारी व पंचवीस पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता.