कंकराळा ग्रामपंचायत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात

0
2

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील कंकराळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सह सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यामध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे विश्वासू व युवा नेते कुणाल राजपुत यांच्या विकासकामांच्या जोरावर बिनविरोध निवड झाली.  बिनविरोध निवड झाल्यामध्ये लोकनियुक्त सरपंच किशोर सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य कुणाल राजपुत , रत्नाबाई ढाकरे , गोरख पवार , सुनिता उबाळे , शाम जैस्वाल , निर्मला सोनवणे , सारीका हिवराळे यांचा समावेश आहे , यावेळी पत्रकारांशी बोलतांना कुणाल राजपुत यांनी सांगितले की, “आजचा निर्णय ऐतिहासिक असुन विकासाचा विजय झाला”.

यादरम्यान सर्व विजयी उमेदवारांचे सत्कार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सोयगाव येथे करण्यात आले , यावेळी उपस्थित बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख आबासाहेब काळे, वि.का.सो.चेअरमन देविदास राजपुत , माजी सरपंच शिवदास राजपुत , तिरुपती पतसंस्था चेअरमन रामदास राजपुत , शहराध्यक्ष संतोष बोडके, शेख बबलु, गटनेते अक्षय काळे , नगरसेवक कदीर शहा, बंटी काळे , भगवान राजपुत , समाधान पाटील, अर्जुन राजपुत , विठ्ठल बडकणे , गोकुळ ढाकरे , संतोष राजपुत , गणेश मचै , मोतीलाल घुसिंगे , दत्तु उबाळे, बबलु राजपुत, प्रताप राजपुत , दिपक मचै , संतोष शिंदे , हिरालाल ढाकरे, विठ्ठल बोराडे , राहुल बोराडे , जगन हिवराळे, रघुनाथ जाधव आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here