खासदारांच्या गावी ग्रामपंचायतीवर भाजपाचा डंका ; बिनविरोध सह एकूण १६ पैकी १४ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा

0
2

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या व जळगाव लोकसभेचे लोकप्रिय खासदार उन्मेशदादा पाटील यांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते गिरीश पाटील यांचा दणदणीत विजय झाल्याने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.
चाळीसगाव तालुक्यात सुमारे 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने पुन्हा एकदा चाळीसगाव तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला ठरला आहे..

खासदार उन्मेशदादा पाटील यांचे मुळगाव दरेगाव ता. चाळीसगाव या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार गिरीश पाटील यांनी राजेंद्र साबळे यांचा एकतर्फी पराभव करीत ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला आहे. वैशाली राठोड, बबन गायकवाड, जगदीश पाटील, रत्‍नाबाई पाटील हे भाजपचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्यपदी बहुमताने निवडून आले असून या अगोदर प्रकाश शिरसाठ व दुर्गाबाई माळी या बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले आहे. त्यामुळे बहुमताने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.

चौफेर विकासावर पुन्हा शिक्कामोर्तब

खासदार उन्मेशदादा पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील हे देखील या ग्रामपंचायतीचे अनेक वर्ष सरपंच होते. दरेगाव हे गाव एरंडोल नांदगाव या मार्गावर असून या खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या आमदारकीचा कार्यकाळापासून आजपावेतो मोठ्या संख्येने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या भरघोस निधीतून विकास कामे झाली होती. गेल्या साडेतीन वर्षात केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावाचा चौफेर विकास करण्यात आला असून आज लोकनियुक्त सरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते गिरीश पाटील मोठ्या मताधिकाने निवडून आल्याने पुन्हा एकदा विकासावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here