साईमत भुसावळ प्रतिनिधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत प्रथमच बदल केले आहेत. या नवीन बदलांमध्ये येथील धडाडीचे कार्यकर्ते अजय भोळे यांची प्रदेश चिटणीस पदी निवड केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी 2024 ची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन पक्षात अनेक धक्कादायक बदल केले आहेत. जिल्हा राज्य पातळीवर संघटनात्मक आणि वेगवेगळया निवडणूक काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वेगवेगळया माध्यमातुन माहिती घेऊन, त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्ष संघटनेत त्यांची निवड केली आहे. येथील अजय भोळे यांनी ही संघटना पातळीवर उत्तम काम केले आहे. पक्ष वाढीसाठी…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी ३ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने कुठलेही जीवित हानी झालेली नाही. मात्र बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते पाचोरा खाजगी बस धावतात यात पाचोऱ्याकडे जात असलेल्या एका खाजगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरून झाडाला धडकली. ही घटना बुधवारी ३ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिरसोली गावाजवळील पेट्रोलपंपानजीक घडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये मोठा…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव-नागद रोडवरील झोपडपट्टीत राहणारा बाजीदखान साबीरखान (वय 23) यास स्थानबंध्द करण्यात आले आहे बाजीदखानविरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न- 1, गंभीर दुखापत- 3, साथीदारांना सोबत घेऊन दंगल करणे-1 असे 5 गुन्हे दाखल होते. वाजीदखानवर वेळोवेळी प्रतीबंधात्मक कारवाई करण्यात येऊनही त्याच्या स्वभावात बदल न झाल्यामुळे त्यास सन 2021 मध्ये जळगाव व नाशिक जिल्ह्यातुन दोन वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले होते. 21 सप्टेंबर, 2022 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये हद्दपारीचा आदेश रद्द झाल्यानंतर 19 नोव्हेंबर, 2022 रोजी वाजीदखानवर चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. 493/2022 भादवि कलम 307, 323, 143, 144, 147, 148, 149, 506 प्रमाणे गुन्हा दाखल कारण्यात…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वर्धमान धाडीवाल व चाळीसगाव शहर अध्यक्षपदी मनोज छाजेड यांची निवड येथरल पदग्रहण सोहळ्यात जाहीर करण्यात आली. भारतीय जैन संघटननेच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त 30 एप्रिलरोजी महाराष्ट्र उपाध्यक्ष विनय पारख, खान्देश अध्यक्ष डॉ. अशोकचंद्र श्रीश्रीमाळ, जळगाव जिल्हाध्यक्ष सुमित मुनोत, चाळीसगावचे संघपती रवींद्र चंपालाल छाजेड, पाचही फिरकीचे संघपती यांच्यासह पारसमल शांतीलाल चोरडिया, सुभाषचंद केवळचंद बेदमुथा, दिलीप राका, सुंतीलाल कोठारी, नरेंद्र जैन, संकेत छाजेड, संदीप बेदमुथा, राजमल सुराणा, तेजमलजी सुराणा, राजमल चतुरमुथा, दिलीपचंद बागमार, दीपक सुराणा, नरेंद्रजी सुराणा, प्रवीण छाजेड, दिलीप घोरपडे, गणेश गवळी, किरण गवळी, रामलाल मिस्तरी, गौतम आरक तसेच चाळीसगावच्या जैन समाजातील असंख्य मान्यवर…
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी नर्मदा बचाव संघटनेच्या आंदोलनाच्या नेत्या सौ मेधा पाटकर यांनी नुकतीच पाचोरा येथे सामाजिक क्षेत्रात सक्रीय क्षत्रिय ग्रुपच्या कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत कार्यकर्त्यांशी हितगुज करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. यापुढे क्षत्रिय ग्रुपला कुठलेही मार्गदर्शन व सहकार्य लागल्यास ते देऊत असेही मेघाताई पाटकर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील महिलांच्या व इतर कुठल्याही समस्यावर आवाज उठवण्यासाठी त्या तत्पर असतात त्या महाराष्ट्रातील विविध भागात फिरून समस्याची माहिती घेत असतात व त्यावर तोडगा काढण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करतात.
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील थोर सन्मित्र मंगल कार्यालयात रविवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीसह निकाल लागणार होता. या निकालाने इंडिया गॅरेज परिसर गजबजून गेला होता.या परिसरात मोठ्या प्रमाणात दवाखाने असल्याने हा परिसर प्रभावित झाला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय झाली होती तर परिसरातील नागरिकांनाही सुटीच्या रविवारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. निकालानंतर फटाके व ढोल ताशांमुळे परिसर प्रभावीत झाला तर विविध हॉस्पिटल्समुळे संवेदनशील असलेल्या या भागात निकाल न ठेवता अन्यत्र ठेवायला हवा होता, असे मत काही वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांनी प्रतिनिधीजवळ व्यक्त केले. शहरातील इंडिया गॅरेज ते शिंपी बोर्डींग हा रस्ता जिल्हा पेठ परिसरातील मुख्य रस्ता आहे.परिसरातील सिंधी कॉलनी रोड,…
साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी शिर्डीच्या साई बाबा मंदिराला देण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या CIFS सुरक्षेला विरोध करत येत्या 1 मे पासून शिर्डी गाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. मात्र या बंद मध्ये साई बाबा मंदिर सहभागी होणारं नाही त्यामुळे भाविकांसाठी मंदिर खुलं राहणार आहे. साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मंदिर प्रशासनाला अनेक वेळा मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 2018 साली सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यानूसार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील मंदिराला केंद्रीय CIFS सुरक्षा देण्याचे निर्देश दिले होते. तर न्यायालयाने याबाबत मंदिर प्रशासनाला देखील आपले म्हणणे मागवले आहे. दरम्यान मंदिर प्रशासनाने…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांतून समोर येत होत्या. या सर्व घटनाक्रमानंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असंही अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, महाराष्ट्रात विविध ठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले अजित पवारांचे काही बॅनरही लावण्यात आले. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सामान्यांना कमी वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशासनात पारदर्शकपणा व गतिमानता आणण्यासाठी सोयगाव प्रशासकीय इमारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सोयगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसिलदार रमेश जसवंत यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, नगरपंचायत अध्यक्षा आशाबी तडवी, शहर प्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे, गटनेते अक्षय काळे, राजू दुतोंडे, कदीर शहा, सर्व सन्माननीय नगरसेवक, पपींद्रपालसिंग वायटी, दिलीप देसाई, पत्रकार मित्र व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विखे…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे ४० आमदारांसह भाजपसोबत(BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवारयांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते…