चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाजगी बसचा अपघात अनेक प्रवासी जखमी ; सुदैवाने जीवित नाही

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी ३ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने कुठलेही जीवित हानी झालेली नाही. मात्र बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते पाचोरा खाजगी बस धावतात यात पाचोऱ्याकडे जात असलेल्या एका खाजगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरून झाडाला धडकली. ही घटना बुधवारी ३ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिरसोली गावाजवळील पेट्रोलपंपानजीक घडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला.

दरम्यान, अपघातानंतर वाहन चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला होता. यात रिना श्रीराम मोहन ( वय – १५) रा. पाचोरा, नूरबानो जमील बागवान (वय – ४४), नम्रा जमील बागवान (वय-२०) रा. पाचोरा आणि ओंकार तुकाराम पाटील (वय ६५) रा. जाम्हणे ता. पाचोरा हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमींना खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here