भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी धाडीवाल, चाळीसगाव शहर अध्यक्षपदी मनोज छाजेड

0
3

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी

भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वर्धमान धाडीवाल व चाळीसगाव शहर अध्यक्षपदी मनोज छाजेड यांची निवड येथरल पदग्रहण सोहळ्यात जाहीर करण्यात आली.

भारतीय जैन संघटननेच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त 30 एप्रिलरोजी महाराष्ट्र उपाध्यक्ष विनय पारख, खान्देश अध्यक्ष डॉ. अशोकचंद्र श्रीश्रीमाळ, जळगाव जिल्हाध्यक्ष सुमित मुनोत, चाळीसगावचे संघपती रवींद्र चंपालाल छाजेड, पाचही फिरकीचे संघपती यांच्यासह पारसमल शांतीलाल चोरडिया, सुभाषचंद केवळचंद बेदमुथा, दिलीप राका, सुंतीलाल कोठारी, नरेंद्र जैन, संकेत छाजेड, संदीप बेदमुथा, राजमल सुराणा, तेजमलजी सुराणा, राजमल चतुरमुथा, दिलीपचंद बागमार, दीपक सुराणा, नरेंद्रजी सुराणा, प्रवीण छाजेड, दिलीप घोरपडे, गणेश गवळी, किरण गवळी, रामलाल मिस्तरी, गौतम आरक तसेच चाळीसगावच्या जैन समाजातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.

हा भारतीय जैन संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ 30 एप्रिलरोजी चाळीसगाव येथील अरिहंत मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी  वर्धमान सुभाषचंद धाडीवाल यांची व चाळीसगाव शहराध्यक्षपदी मनोज छाजेड यांची निवड जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष निलेश शिवचंद्र ललवाणी, सचिव धीरज स्वरूपचंद रुणवाल तसेच महिला शहराध्यक्ष म्हणून संगीता नैनसुख अलीझाड, उपाध्यक्ष माधुरी धीरज रुनवाल, सचिव स्वाती शैलेश अब्बड यांच्या नावाची घोषणा खान्देश अध्यक्ष अशोकचंद श्रीश्रीमाळ यांनी केली.

यावेळी भारतीय जैन संघटनेमार्फत भविष्यात रक्तदान शिबिरे , नाला  खोलीकरण, आरोग्य शिबिर व सामूहिक विवाह समारंभ अशा उपक्रमांचे आयोजन करून समाजाला उपयुक्त ठरण्याचे काम करण्यात येईल असेही सांगण्यात आले.
प्रास्ताविक कुशल सोलंकी व सुत्रसंचालन सोनम खाबीया यांनी केले तर आभार धीरज रुणवाल यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here