साईमत भुसावळ प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत प्रथमच बदल केले आहेत. या नवीन बदलांमध्ये येथील धडाडीचे कार्यकर्ते अजय भोळे यांची प्रदेश चिटणीस पदी निवड केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी 2024 ची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन पक्षात अनेक धक्कादायक बदल केले आहेत. जिल्हा राज्य पातळीवर संघटनात्मक आणि वेगवेगळया निवडणूक काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वेगवेगळया माध्यमातुन माहिती घेऊन, त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्ष संघटनेत त्यांची निवड केली आहे. येथील अजय भोळे यांनी ही संघटना पातळीवर उत्तम काम केले आहे. पक्ष वाढीसाठी त्यांचे चांगले योगदान राहिले आहे. त्यामुळे भोळे यांना प्रदेश संघटनेत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीमुळे भुसावळ आणि जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणे घडू शकतात, अशी राजकिय चर्चा होऊ लागली आहे.