साईमत जळगाव प्रतिनिधी मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवणुक करायला लावून हर्ष धनश्याम अडवाणी (रा. रिंगरोड) या तरुणाची सायबर चोरट्याने 91 हजारात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात सायबर चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. हर्ष अडवाणी हा 4 फेब्रुवारी रोजी इस्टाग्राम पाहत असताना त्याला सौरव बिटकॉइन ट्रेडर्स हे अकाउंट दिसले. त्यावर चाट करत असताना बिटकॉइनमध्ये 20 हजार रूपये गुंतविले तर दोन तासात तुम्हाला चांगला नफा होईल, असे सांगण्यात आले. हर्ष याने विश्वास ठेवून 20 हजार रुपये ऑनलाइन पाठविले. 2 तास उलटूनही नफ्याची रक्कम मिळाली नाही म्हणून त्याने त्या अकाउंटवर मेसेज केले. त्यावर त्याला हॅण्डलिंग…
Author: Saimat
साईमत रावेर प्रतिनिधी यावल तालुक्यासह जिल्हाभरात बेमोसमी हवामानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा अडचणीत आला असून वादळी – वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे कोणत्याही जाचक – अटी न घालता पंचनामे करावे अशा सूचना प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी स्थानीक प्रशासनाला केल्या आहेत. रावेर शहरात अतिशय जुनी व मोठी झाडे थेट घरावर कोसळल्याने घरे तुटून उध्वस्त झाली आहे. यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवंत हानी झालेली नसली, तरी घर – संसार उघडल्यावर आले आहे. नुकसान ग्रस्त परिवाराला आधार म्हणुन शासनाकडून तात्काळ मदत देण्यात यावी. सर्वाधिक नुकसान केळी उत्पादक क्षेत्र असलेल्या रावेर – यावल तालुक्यातील खिरोदा, रसलपुर, मंगरूळ, पिंपरी, अहिरवाडी…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी येथील नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 425/क मधील धुळे रोड टच के.आर.कोतकर कॉलेजच्या जुन्या कँटीनपासून ते ट्रामा रुग्णालयाच्या कंपाउंडच्या भिंतीपर्यंत 1.17 हे. आर (पावणे तीन एकर) जागा नगरपालिकेने स्मशानभूमीसाठी मंजूर केलेली आहे. यासंदर्भात ठराव क्रमांकानुसार जागा मंजूर केली आहे. के.आर.कोतकर कॉलेजजवळील 1 एकर जागा हिंदू स्मशानभूमीसाठी मंजूर असतांना 20 ते 22 वर्षांपासून हिंदू समाजाची (हिंदू धर्मातील सर्व जातीचीं) अंत्यसंस्कारासाठी अवहेलना का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे यासंदर्भात जन भावनांचा आदर करून लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्येकर्ते किरण आढाव यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किरण आढाव यांनी दिला आहे.चाळीसगाव नगरपालिका यांनी…
साईमत पाळधी, ता.धरणगाव प्रतिनिधी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती उत्सवानिमित्त पाळधी येथील पोलीस स्थानकाजवळील मिरची ग्राउंडवर शनिवारी, 10 जून रोजी सायंकाळी सात वाजता गायक आनंद शिंदे यांच्या भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाला गायक आनंद शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत गायन करून महापुरुषांच्या कार्याला उजाळा देणार आहेत. कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीचे अनेक दिग्गज नेते आदी उपस्थित राहतील. पाळधी खुर्द येथे बौद्ध विहाराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण आनंद शिंदे…
साईमत जळगाव प्रतिनिधी जागतिक पर्यावरणदनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे येथील जिल्हा न्यायालय आवार, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, बस स्टॅण्ड आणि रेल्वेस्टेशन या ठिकाणी वृक्षारोपण पार पडले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे क्लीन ग्रुप जळगावचे मदन लाठी, हेमंत बेलसरे, सुजाता देशपांडे, माधुरी कुळकर्णी, जैन स्पोर्ट्स अकादमीचे शेख, वसंत पाटील, रवि नेटके, आदी आणि वकील वर्ग उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख साहेब, एस.पी. सैय्यद सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सुरेंद्र काबरा, जिल्हा सरकारी वकील यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी श्री. माळी ॲडमीन मॅनेजर, एस.एन. पाटील अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, श्री. अविनाश कुळकर्णी, वरीष्ठ लिपीक श्री. प्रमोद ठाकरे,…
साईमत जळगाव प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 5 जून या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा भारती रंधे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.माजी महापौर डॉ. अश्विन सोनवणे, सरिता ललित कोल्हे, नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे, ॲड.अभिजीत जितेंद्र रंधे, नगरसेविका रेश्मा काळे, कुंदन काळ,े शोभा चौधरी, केशवराव म्हस्के, माजी नगरसेविका कमलताई म्हस्के, निशा पवार, शंतनु नारखेडे, हर्षल मावळे, शुभांगी बिराडे, संकेत कापसे, नारखेडे साहेब आदी उपस्थित होते. त्यावेळी शक्ती फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष मृणालिनी रंधे प्रकाश सोनवणे निरंजना तायडे लोकेश चौधरी पृथ्वीराज देशमुख संतोष भंगाळे मयूर देशमुख यांनी कार्यक्रमाचे सर्व परिश्रम घेतले..शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रमुख अतिथींना गोल्डन ट्री…
साईमत चोपडा प्रतिनिधी मंगरूळ (ता. चोपडा) येथील शेतकऱ्याने अतिक्रमणाच्या कारणkवरून गेल्या 30 दिवसांपासून उपोषण सुरू कले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा 30 वा दिवस आहे. आंदोलनाला महिना उलटला तरी अद्याप शेतकऱ्यास न्याय न मिळाल्याने त्यांचे आंदोलन सुरूच आहे. प्रशासकीय पातळीवर आंदोलनाची दखल घेतली मात्र न्याय अजूनही मिळालेला नाही. प्रकाश श्रीधर पाटील असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या जागेत काही जणांनी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात त्यांनी सातत्याने तक्रारी करूनही दखल न घेतली गेल्याने त्य्ाांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने अतिक्रमण काढून त्याचा खर्च बळीराम दामू पाटील यांच्याकडून वसूल करावा आणि त्या रकमेचा भरणा ग्रामपंचायतीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील जातीयवादी हल्यात शहीद झालेल्या अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाचा व लातूर मधील रेणापूर येथील मातंग बांधव गिरिधारी तपघाले यांचा निर्घृण खून करण्यात आला. मुंबई चर्चगेट येथील वसतिगृहात राहणाऱ्या हिना मेश्राम या बौद्ध तरुणीचा बलात्कार करून क्रुरपणे हत्याकांड करण्यात आले यातील गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहिजे या अशयाचे निवेदन समता सैनिक दला तर्फे तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दि 9 रोजी देण्यात आले. या प्रसंगी समता सैनिक दलाचे स्वप्निल जाधव, नितीन मारसाळे, बाबा पगारे, विशाल पगारे, दिपक बागुल, विष्णु जाधव, राजू अहिरे, मुकेश बागुल, वहीद पठाण, शिवाजी शिंदे, विश्वजीत जाधव,…
साईमत जळगाव प्रतिनिधी शेत, शेतकरी यांच्या जीवनात विज्ञानाच्या मदतीने उत्पन्न वाढीच्या दृष्टिने जैन इरिगेशनसह इतर कृषिपुरक कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र सामाजीक, राजकीय, शासकीय सर्वच स्तरावर सामाजिक प्रश्न जो गांभीर्य धरत आहे तो म्हणजे शेत, शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळत नाही. ही प्रतिष्ठा फालीसारख्या उपक्रमातून मिळू पहात आहे. समाजाकडून जे घेतले त्यातून उतराई होण्याचा फाली हा उपक्रम कौतूकास्पद असल्याचे प्रतिपादन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केले. जैन हिल्स येथे सुरू असलेल्या फाली च्या नवव्या संमेलनाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत अतुल जैन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांच्यासह ज्यांनी प्रायोजकत्व केले त्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुत्रसंचालन हर्ष…
साईमत जळगाव प्रतिनिधी ”जो जेथे आहे तेथेच तो राहिलं. भाजपमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. माधवराजे शिंदे, ज्योतिरादित्य शिंदे, हर्षवर्धन पाटील, अशी भाजपमध्ये अनेक उदाहरणे दाखवता येतील. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये असले तरी अद्यापही त्यांच्या मुलीने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. पण जो ज्या ठिकाणी आहे तिथेच त्यांनी काम करावं. रक्षा खडसे भाजपमध्ये असतील तर त्यांनी तिथेच प्रामाणिकपणे काम करावं. एका घरात असले तरी विचार वेगवेगळे असू शकतात. अशी अनेक उदाहरणे आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिली. आ.एकनाथराव खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या आरोपांवरही भाष्य केलं. रक्षा खडसे यांना भाजपमध्ये मोकळेपणाने काम करण्याची संधी…