साईमत चाळीसगाव प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील जातीयवादी हल्यात शहीद झालेल्या अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाचा व लातूर मधील रेणापूर येथील मातंग बांधव गिरिधारी तपघाले यांचा निर्घृण खून करण्यात आला. मुंबई चर्चगेट येथील वसतिगृहात राहणाऱ्या हिना मेश्राम या बौद्ध तरुणीचा बलात्कार करून क्रुरपणे हत्याकांड करण्यात आले यातील गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहिजे या अशयाचे निवेदन समता सैनिक दला तर्फे तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दि 9 रोजी देण्यात आले.
या प्रसंगी समता सैनिक दलाचे स्वप्निल जाधव, नितीन मारसाळे, बाबा पगारे, विशाल पगारे, दिपक बागुल, विष्णु जाधव, राजू अहिरे, मुकेश बागुल, वहीद पठाण, शिवाजी शिंदे, विश्वजीत जाधव, राहुल निकम, राहुल बेंगळे, वाल्मिक मोरे, राजेंद्र वाघ, घनश्याम बागुल, जेष्ठ सैनिक महेंद्र जाधव,मनोज जाधव, इत्यादी सैनिक उपस्थित होते.