Author: Saimat

साईमत नाशिक प्रतिनिधी इंडिगो विमान कंपनीच्या माध्यमातून नाशिकहून विमानसेवा सक्षमपणे सुरू करण्यात आली असून त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. पहिल्याच दिवशी पाच शहरांसाठीच्या सेवांचा 646 लोकांनी लाभ घेतला.इंडीगो कंपनीच्या माध्यमातून 1 जूनपासून सूरू करण्यात आलेल्या सेवांना प्रवाश्यांनी प्रतिसाद दिलेला असून अहमदाबाद, इंदौर, गोवा, हैद्राबाद व नागपूर या शहरांतून 358 प्रवाशी शहरात दाखल झाले आहेत. तर 288 प्रवाश्यांनी या शहरांसाठी विमान सेवेचा लाभ घेतलेला आहे.त्यात प्रामुख्याने नाशिकहून जाणार्‍या विमानांपैकी अहमदाबादसाठीच्या दोन विमानांतून 74 प्रवाश्यांनी प्रवास केला आहे. तर इंदौरसाठी 36 प्रवाशी, गोव्यासाठी 62 प्रवासी, हैद्राबादसाठी 65 प्रवाशी तर नागपूरसाठी 51 प्रवाश्यांनी सेवेचा लाभ घेतला. तर विविध शहरांतून नाशिकला…

Read More

साईमत पाचोरा प्रतिनिधी नगरदेवळा संस्थांचे जहागीरदार तथा येथील माणिकराजे पवार आणि विश्वासराव पवार शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्रीमंत सरदार बाळासाहेब कृष्णराव शिवराव पवार यांना त्यांच्या 19 व्या पुण्यतीथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 2 जून 2023 रोजी आयोजित कार्यक्रमात श्रीमंत सरदार स्व. बाळासाहेब के. एस. पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, विश्वस्त प्रा.रवींद्र चव्हाण तसेच सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून…

Read More

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील  मेहूणबारे येथे भऊर रस्त्यालगत एका बंद बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सुमारे 26 जुगाऱ्यांना पकडले. या कारवाईत पोलीसांनी 61 हजार रूपये रोख व 2 लाख 8हजार रूपये किंमतीच्या 8 दुचाकी असा 2 लाख 69 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला असून मेहूणबारे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांना माहिती मिळाली की, मेहुणबारे गावी भऊर गावाकडे जाणाऱ्या रोडलगत गढरी मळा येथे बंद घरात काही इसम हे स्वतःच्या फायद्यासाठी 52 पत्त्याचे कॅटवर…

Read More

साईमत रावेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रावेर हे रेशन माफियांचे केंद्र बनले आहे. रावेर – बर्हाणपूर मार्गावर असलेल्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य साठवून ते मध्यप्रदेशात काळ्या बाजारात विक्री केले जाते. याच संशयामुळे जिल्हाधिकारी अमान मित्तल यांनी बुधवारी छापे टाकून गोदाम सील केले. मात्र, त्यांनी तपासणी केल्याचे स्थानिक महसूल प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र, गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या छापेमारी सारखे ‘अर्थपूर्ण’ घडामोडीतून कारवाई थांबविली जाईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रावेर हे मध्यप्रदेशापासून जवळचे शहर आहे. मध्यप्रदेशातील खरगोन आणि खंडवा येथे काही गोदाम आणि तांदूळ पॉलिस करणारे छोटे कारखाने आहेत. रावेर, यावल आणि परिसरातील गावातील रेशन दुकानांमधून रेशनचा माल…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जैन इरिगेशन (Jain Irrigation)  क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर 21 धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. कांदिवली येथील मुंबई (Mumbai)क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब यांच्यात रंगला. या सामन्यात जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 165 धावा केल्या. त्यात 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील डावखुरा खेडाळू कौशल तांबे याने सर्वाधिक 44 धावांचे योगदान दिले. विजयासाठी 166 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबला 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारता आली. जैन इरिगेशनचा…

Read More

साईमत पुणे प्रतिनिधी मान्सून यंदा वेळेत दाखल होणार आहे. त्यामुळे बळीराजा देखील आता वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहे. स्कायमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सून येईल, असे संकेत मिळालेत. कोकणात 27 मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. 5 ते 7 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले आहे. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. पुढील 3-4 दिवसात पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे. उष्णकटिबंधीय वादळ आले…

Read More

          संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन येत्या रविवारी होत आहे परंतु सरकार पक्ष आणि विरोधक यांच्यात सभागृहात वाद होण्याऐवजी बाहेरच सुरू झाल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. या नव्या इमारतीचे उद्घाटन कोणी करावे? हा वादाचा मुख्य मुद्दा दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करतील,असे सरकारतर्फे आधीच जाहीरही करण्यात आले आहे.सध्या मोदी म्हणजेच सरकार अशी स्थिती असल्याने त्यांंनी निर्णय घेतल्यावर तो आपोआपच सरकारी निर्णय होतो.त्यास विरोध कोण करणार?भारतीय जनता पक्षातील एकाही नेत्याची,खासदार-आमदार यांची तशी हिंमतही नाही. त्यानंतर उरले राजकीय विरोधक. देशात लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले जात असले तरी विरोधकांना मोदी किंमत देत नाहीत.त्यांच्यात ‘राष्ट्रीयत्वाची भावना…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी आंतर जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा शिरपूर(ता.धुळे)येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे 25 मे पासून खेळवल्या जाणार असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा 14 वर्षातील मुलांचा संघ निवडण्यात आला. त्या संघाला आज जिल्हा क्रीडा संकुल येथे एका छोटेखानी समारंभातून निरोप देण्यात आला.   संघात यांची झाली निवड कर्णधारपदी अनुभूती शाळेचा आयुष भोर तर  उपकर्णधारपदी अमळनेरच्या सैय्यद अलतमशची निवड करण्यात आली. ध्रव भुजवाणी,  तुषार गुजर, ॠषिकेश परदेशी, कौशतुब महाजन, ताबीश खान, देवेंद्र पाटील, अनय रडे ( सर्व जळगाव) सुशांत गायकवाड,आदित्य जोशी, प्रतीक सराफ, रयान रोस, आशुतोष मिश्रा, कलश गवले, लोकेश पाटील ( सर्व भुसावळ). मारूफ खान, सैय्यद अलतमश, कुणाल देवकाते (सर्व…

Read More

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव रेल्वे स्थानक हे तीन जिल्ह्याच्या सीमेवर असून येथून अनेक प्रवासी प्रवास करतात  मात्र पाहिजे तेवढ्या रेल्वे गाड्याना चाळीसगाव  स्थानकावर थांबा नाही, रेल्वे विभागाने रेल्वे गाड्यांना येथे थांबा दिल्यास सरकारी नोकरदार, विद्यार्थी तसेच  छत्रपती संभाजी नगर, नासिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने रेल्वे गाड्याना  चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देवून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने डी. आर. एम. भुसावळ यांना चाळीसगाव रेल्वे प्रबंधक द्वारा निवेदनाद्वारे  करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कर्नाटक एक्सप्रेस डाऊन गाडी नंबर १२६२७  ही दुपारी ३ वाजून ४०  मिनिटांनी तर अप १२६२८  ही गाडी दुपारी २…

Read More

साईमत पुणे प्रतिनिधी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तर दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 2 वाजेनंतर पाहता आला. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेण्यात आली होती. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागात राज्यभरातून 12 लाखांवर विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. तसेच त्यांची प्रिंट घेता येईल. कोणत्या विभागाचा किती निकाल कोकण विभाग – सर्वाधिक 96.01…

Read More