साईमत जळगाव प्रतिनिधी
कापसाला बारा हजार रूपयांचा भाव मिळावा म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण हे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुटले.
कापसाला बारा हजार रूपयांचा किमान भाव मिळावा, तसेच शेतकर्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात याव्ो या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी दिनांक १४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांनी भेटी देऊन पाठींना दर्शविला होता. उपोषणाच्या दुसर्या दिवशी जागरण आणि गोंधळाच्या अनोख्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला होता.
दरम्यान, दि १६ जून रोजी अमळनेरात राष्ट्रवादीचा मोठा कार्यक्रम झाला. यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम आटोपून दि १६ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अजित पवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी आगामी विधीमंडळाच्या अधिव्ोशनात कपाशीच्या प्रश्नावर मुद्दा उपस्थित करून शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. यानंतर रवींद्र नाना पाटील यांना त्यांनी िंलबू सरबत देऊन त्यांच्या उपोषणाची सांगता केली.
नेकी कर कचरे में डाल
शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लागाव्या तसेच बळीराजाच्या घरात पडून असलेल्या पांढऱ्या सोन्याला १२ हजार क्विंटली भाव मिळावा यासाठी १४ जून पासून राष्ट्रवादीची युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाचा बडगा उगारला होता. हे स्वागतार्हय आहे मात्र उपोषणाची सांगता झाल्यानंतर ज्याठिकाणी उपोषण सुरु होते त्या उपोषण स्थळाला अक्षरश: डंपींग ग्राऊंडचे स्वरुप आल्याचे चित्र उभे राहिले आहे. यामुळे स्वच्छताप्रीय असणाऱ्या सुज्ञ नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी दि.१४ जून रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणास जिल्हाभरातून अनेकांनी पाठींबाही दर्शविला होता. १६ जून रोजी रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कपाशीच्या मुद्यावर विधीमंडळात मुद्दा उपस्थित करत न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिल्यानंतर सदर उपोषणाची सांगता झाली. मात्र त्यानंतर दोन दिवसांपासून उपोषणस्थळी सन्मानाने डोलणारे पक्षाचे ध्वज अक्षरश: पायदळी आल्याचे चित्र दुसऱ्या दिवशी सकाळी उपोषणस्थळी दिसून आले. वास्तविक पाहता उपोषण किंवा आंदोलनाच्या संदर्भात प्र्रशासनाकडून परवानगी घेतांना आंदोलनस्थळाची जागा विद्रुप होणार नाही यासंदर्भात लेखी दिले जाते. मात्र या आंदोलनानंतर उपोषणस्थळाच्या जागेला डंपींग ग्राऊंडचे चित्र उभे राहिले आहे.
दरम्यान, उपोषणाची सांगता करणारे राष्ट्रवादीचे तथा विरोधीपक्ष नेते हे शिस्तप्रिय व स्वच्छतेचे पाईक असणारे नेते आहे. त्यांनी अस्वच्छतेच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणांना धारेवर धरल्याचे उदाहरणे आहेत. मात्र जळगाव शहरात त्यांनी उपोषणाची सांगता केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य हे त्यांच्यासारख्या शिस्तप्रिय नेत्यांना कितपत आवडेल? याचे आत्मचिंतन त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे असा सुरही जनमानसामधून उमटत आहे.