साईमत ओझर प्रतिनिधी
ओझर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. ए. एल. हायस्कूल म.मा. 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यालयाचे कार्यतत्पर मुख्याध्यापक मा.आर.एल.पगारे सर यांचे शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यानंतर सर्व चिमुकले बालगोपलांचे शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री आर.एल.पगारे सर,शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम, ज्येष्ठ शिक्षक श्री एस.पी.मैन सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री आर.एल.पगारे सर,पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम, ज्येष्ठ शिक्षक श्री एस.पी.मैन सर यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत व पहिल्याच दिवशी मिळालेली पाठ्यपुस्तके,तसेच पोषण आहारातील मिळालेली खिचडी व गोड शिरा याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासूनच शाळेत यावे शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने प्रभाव फेरीचे आयोजन ओझर टाऊनशिप परिसरात करण्यात आले होते. अनेक घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या त्यामुळे ओझर टाऊनशिप चा परिसर सर्वत्र शिक्षणमय झाला.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.