साईमत चाळीसगाव प्रतिनिधी
तालुक्यातील जामडी येथे फकिर तरुणाची अल्पवयीन तरुणाने पूर्ववैमनस्यातून चाकूचे वार करीत हत्या केली होती. या प्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेतल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील जामडी येथील एका धार्मिक स्थळावर काम करणार्या तबरेज शहा याकूब शहा ( वय ३४ ) या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने सुमारे चार वर्षांपूर्वी विषारी द्रव प्राशन करीत आत्महत्या केली होती. हा राग डोक्यात ठेवून तरुणीच्या अल्पवयीन भावाने गुरुवारी दुपारी तरुणावर पाठीमागून चाकूचे सपासप वार केल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता. तरुणाच्या खुनानंतर संतप्त नातेवाईकांनी गुन्ह्यातील आरोपींना अटकेची मागण केली होती.
खून प्रकरणी अजमल शहा याकूब शहा यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीनासह भिकन अजीज शेख, एजाज शेख, एजाज शेख भिकन शेख, मुश्ताक शेख नसीर शेख (सर्व जामडी, ता.चाळीसगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे.