साईमत भुसावळ प्रतिनिधी शेअर बाजारात गुंतवणूक करतांना प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने विचार करून गुंतवणूक केली पाहिजे. शेअर बाजाराचा अभ्यास करताना रिटेलरच्या विरूध्द विचार केला पाहिजे. तरच त्यात यश संपादन करता येते असे प्रतिपादन इंदौर येथील वित्तीय गुंतवणूक सल्लागार विजय महाजन यांनी केले. येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानाच्या चर्चासत्रात “शेअर बाजाराचा रहस्य भेद” विषयावर ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रकाश फालक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. व्ही. डी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य…
Author: Saimat
साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर जरंडी प्राथमिक केंद्रअंतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदेच्या शाळेवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “The Grace mission” छत्रपती संभाजीनगर यांच्या उपक्रमातून इयत्ता पहिली ली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, नोटबुक पेन या शालेय साहित्याची वाटप करण्यात आली. यावेळी आकाश उजगरे ,योगेश साबळे,प्रतिक गायकवाड ,पावन रोकडे वसीम शेख सर ,मिलिंद कोल्हे सर , संतोष मोरे राजेंद्र मोरे दशरथ चौधरी दीपक भोटकर यांची उपस्थिती होती रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर या उपक्रमामुळे आदीवासी विद्यार्थ्यांचा चेहरा खुळून आला होता.
साईमत बोदवड प्रतिनिधी बोदवड महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने पुणे विद्यापीठातील गणित विभागाचे माजी विभागप्रमुख प्रोफेसर एस. ए. कात्रे भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे यांचे गणितातील ‘आयलर्स फाय फंक्शन आणि आरएसए क्रिप्टोग्राफी” या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचे आयोजन बोदवडच्या गणित विभाग आणि “इंडियन अकॅडमी ऑफ इंडस्ट्रियल अँड अॅपलिकेबल मॅथेमॅटिक्स” या प्रसिद्ध संस्थेद्वारे आयोजित करण्यात आले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना गणितातील उपयोगितेचे महत्व समजण्यास मदत झाली व प्रेरणा मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले . लोकमान्य टिळक चेअरचे अध्यक्ष असलेले प्राध्यापक डॉ कात्रे हे आपल्या देशाचे टीमलीडर म्हणून अर्जेंटिना आणि जर्मनी येथे झालेल्या “इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलंपियाड” स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे…
साईमत नांदुरा प्रतिनिधी नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड यांना त्या कारणाने चर्चेत होती, मागील अध्यक्ष व संचालक मंडळाचे वाद-विवादामुळे बँकेतून मोठ्या प्रमाणावर ठेवी परत गेल्या बँकेची निवडणूक झाली त्यात बँकेचा माजी अध्यक्ष व अनेक संचालकाना सभासदांनी पराभव दाखविला मागील संचालक मंडळातील चार पाच संचालक निवडून आले. इतर सर्व नवीन संचालक आहे. बँकेचे माजी अध्यक्ष अरुण पांडव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे दिनांक २९ मार्च २०२३ रोजी निलंबित केले होते. त्या दिवशी बँकेचे प्रोसिडिंग बुक घेऊन पांडे पळून गेल्याची तक्रार माजी अध्यक्षांनी दाखल केली होती. आज रोजी साडेचार महिने उलटून गेल्यावरही निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे पदावर कसे काय…
साईमत मलकापूर प्रतिनिधी शहरातील पारपेठ भागातील एका २१ वर्षांय अल्पसंख्याक युवकांने पाकिस्तानच्या समर्थनार्थ इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ‘१४ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पाकिस्तान’ तसेच ‘पाकीस्तानी झेंडे व पाकिस्तानी असल्याचा अभिमान आहे’ स्वातंत्र दिवस आहे अशी पोस्ट आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवली. ही बाब काहींना समजताच त्यांनी मलकापूर पोलीस स्टेशन गाठीत ‘ त्या ‘ युवका विरूध्द तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. एकीकडे देशवासी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना १५ ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका अल्पसंख्यांक युवकाने आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने शहरात एकच खळबळ उडाली. तर या प्रकाराबाबत परीसरातील देश भक्तांनी…
साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला असून या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी “मेरी माटी मेरा देश” अर्थात ‘माझी माती माझा देश’ या संकल्पनेला जनमाणसापर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका युवासेनेतर्फे जळगाव ग्रामीणमध्ये ‘माझी माती माझा देश’ हे अभियान उत्साहात राबविण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या ‘माझी माती माझा देश’ या अभियानांतर्गत सोमवारी तरुणाईतर्फे…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जुन्या औद्योगिक वसाहत मधील सिद्धिविनायक प्राथमिक माध्यमिक व इंग्रजी माध्यम विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 77वा स्वतंत्रता दिवस समारोह उत्साहात साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंतनु भारद्वाज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी डॉक्टर अमृता सोनवणे , नगरसेविका सौ रंजनाताई वानखेडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उत्तम दादा सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वानखेडे श्री.जनार्धन खडके उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष व ट्री गार्ड वाटप करण्यात आलेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनकडून 77 जागी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीसाठी लिग्रांड प्रायव्हेट लिमिटेड कडून झाडांची रोपे व ट्री गार्ड उपलब्ध करून देण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी देशभक्तीपर…
साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी माजी जि.प.अध्यक्ष, औरंगाबाद हरिश्चंद्र लघाने यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.यावेळी अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बाबुरावजी काळे, व संस्थेचे सचिव प्रकाश बाबुरावजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल च्या विद्यार्थिनींनी देशभक्ती गीत .विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. व इ.10वी उतीर्ण व निबंध स्पर्धेत सहभाग असलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आले. या ध्वजारोहणासाठी सोयगाव नगरपंचायत चे नगराध्यक्षा श्रीमती आशा तडवी,संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे ,ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य…
साईमत यावल प्रतिनिधी जळगाव (Jalgaon) जिल्हा बँकेच्या यावल तालुक्यातील ज्येष्ठ महिला सभासद श्रीमती पुष्पाताई लीलाधर चौधरी यांच्या शुभहस्ते जळगाव जिल्हा बँकेचे झेंडावंदन करण्यात आले.जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे रावेर लोकसभा व विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कौतुक आणि स्वागत केले जात आहे. एकेकाळी आशिया खंडात नावारूपाला असणारी दगडी बँक म्हणजेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Jalgaon District Central Cooperative Bank) या बँकेमध्ये चेअरमन म्हणून जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय ज्येष्ठ नेत्यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे परंतु विद्यमान चेअरमन भाऊसाहेब संजय मुरलीधर पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाल्यानंतर प्रथम झेंडावंदन त्यांच्या…
साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर जरंडी प्राथमिक केंद्रअंतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदेच्या शाळेवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “The Grace mission” छत्रपती संभाजीनगर यांच्या उपक्रमातून इयत्ता पहिली ली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, नोटबुक पेन या शालेय साहित्याची वाटप करण्यात आली यावेळी आकाश उजगरे ,योगेश साबळे,प्रतिक गायकवाड ,पावन रोकडे वसीम शेख सर ,मिलिंद कोल्हे सर , संतोष मोरे राजेंद्र मोरे दशरथ चौधरी दीपक भोटकर यांची उपस्थिती होती रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर या उपक्रमामुळे आदीवासी विद्यार्थ्यांचा चेहरा खुळून आला होता.