‘आयलर्स फाय फंक्शन आणि आरएसए क्रिप्टोग्राफी” विषयावर बोदवड महाविद्यालयात प्रोफेसर एस. ए. कात्रे यांचे व्याख्यान

0
3

साईमत बोदवड प्रतिनिधी

बोदवड महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने पुणे विद्यापीठातील गणित विभागाचे माजी विभागप्रमुख प्रोफेसर एस. ए. कात्रे भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे यांचे गणितातील ‘आयलर्स फाय फंक्शन आणि आरएसए क्रिप्टोग्राफी” या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या व्याख्यानाचे आयोजन बोदवडच्या गणित विभाग आणि “इंडियन अकॅडमी ऑफ इंडस्ट्रियल अँड अॅपलिकेबल मॅथेमॅटिक्स” या प्रसिद्ध संस्थेद्वारे आयोजित करण्यात आले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना गणितातील उपयोगितेचे महत्व समजण्यास मदत झाली व प्रेरणा मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले . लोकमान्य टिळक चेअरचे अध्यक्ष असलेले प्राध्यापक डॉ कात्रे हे आपल्या देशाचे टीमलीडर म्हणून अर्जेंटिना आणि जर्मनी येथे झालेल्या “इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलंपियाड” स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रुपेश मोरे आणि सूत्रसंचालन रूपाली चौधरी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here