मोबाईलच्या स्टेटसवर ठेवली आक्षेपार्ह पोस्ट

0
4

साईमत मलकापूर प्रतिनिधी

शहरातील पारपेठ भागातील एका २१ वर्षांय अल्पसंख्याक युवकांने पाकिस्तानच्या समर्थनार्थ इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ‘१४ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पाकिस्तान’ तसेच ‘पाकीस्तानी झेंडे व पाकिस्तानी असल्याचा अभिमान आहे’ स्वातंत्र दिवस आहे अशी पोस्ट आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवली. ही बाब काहींना समजताच त्यांनी मलकापूर पोलीस स्टेशन गाठीत ‘ त्या ‘ युवका विरूध्द तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

एकीकडे देशवासी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना १५ ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका अल्पसंख्यांक युवकाने आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने शहरात एकच खळबळ उडाली. तर या प्रकाराबाबत परीसरातील देश भक्तांनी प्रचंड रोष व्यक्त केला. त्यानंतर शहरातील काही देशभक्तांनी शहर पोलीस स्टेशन गाठीत सदर युवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनीही तात्काळ युवकाला ताब्यात घेतले.

सदर युवकाने गंभीर स्वरूपाचा प्रकार केला असतांनाही व देश वासियांच्या भावना दुखावल्या असतांना व अशाप्रकारामुळे एखादवेळी शहरात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसतांना देखील पारपेठ भागातील काही अल्पसंख्याक पुढारी या युवकाला वाचविण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले होते.

घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य व या प्रकरणी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनंतर मुजंमील खान अहेमद खान (वय २१ वर्ष) रा. जुना इदगाहचे मागे फिरदोस कॉलनी, पारपेठ याच्यावर पोलीसांनी कलम ५०५ (ब), ५०२ (२), ५०४, ५०६ नुसार दाखल केला असून पुढील तपास मलकापूर पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here