प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने विचार करून गुंतवणूक केली पाहिजे – विजय महाजन

0
2

साईमत भुसावळ प्रतिनिधी

शेअर बाजारात गुंतवणूक करतांना प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने विचार करून गुंतवणूक केली पाहिजे. शेअर बाजाराचा अभ्यास करताना रिटेलरच्या विरूध्द विचार केला पाहिजे. तरच त्यात यश संपादन करता येते असे प्रतिपादन इंदौर येथील वित्तीय गुंतवणूक सल्लागार विजय महाजन यांनी केले.

येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानाच्या चर्चासत्रात “शेअर बाजाराचा रहस्य भेद” विषयावर ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रकाश फालक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. व्ही. डी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. ब-हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी, नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. एस. टी. धुम व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून नियोजन अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

विजय महाजन यांनी आपल्या व्याख्यानात शेअर बाजाराची संकल्पना समजून घेणे, शेअर बाजारात गुंतवणुकीची व्यूहरचना व संधी ओळखण्याचे तंत्र, शेअर बाजारातील जोखीम व्यवस्थापन, जोखीम कमी करून भांडवल कसे सुरक्षित ठेवावे? शेअर्सचे विश्लेषण करण्याची तांत्रिक पद्धती आणि पायाभूत आणि तांत्रिक विश्लेषण, शेअर बाजार गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ कसा तयार करावा? शेअर बाजारातील मानसशास्त्र व भावनांचे व्यवस्थापन अशा विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकत शेअर बाजारात प्रवेश करण्यापूर्वी त्यातील धोके ओळखणे आवश्यक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करतांना प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने विचार करून गुंतवणूक केली पाहिजे. शेअर बाजाराचा अभ्यास करताना रिटेलरच्या विरूध्द विचार केला पाहिजे. तरच त्यात यश संपादन करता येते असे प्रतिपादन विजय महाजन यांनी केले.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.व्ही. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की, असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असतात. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे. सदर कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, शेअर बाजाराचे अभ्यासक, गुंतवणूकदार, माजी प्राध्यापक, महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. एस. टी. धुम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. किरण वारके यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. अक्षरा साबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शितल सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. ब-हाटे, डॉ.ए.डी.गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागातील प्रा. व्ही.ए. सोळुंके, प्रा. जितेंद्र आडोकार, प्रा. शिवानी माळी, डॉ. ममताबेन पाटील, वाणिज्य विभाग आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here