Author: Saimat

साईमत, औरंगाबादः प्रतिनिधी देशाचे चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही, त्यामुळे मी पुन्हा येईल, असे कितीही सांगितले तरी त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल, अशी टिका शरद पवार यांनी मोदींवर केली आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते. मी पुन्हा येईन, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना व्यक्त केला होता. यावरुन आता शरद पवारांनी टीकास्त्र सोडले आहे. मणिपूरजवळ चीन आहे, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घडणाऱ्या सर्व गोष्टी देशाच्या दृष्टीने घातक आहेत, ९० दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. अविश्वास ठरावाच्या दिवशी मणिपूरवर २ मिनिटे बोलले आणि इतर विषयावर २ तास बोलले. प्रधानमंत्र्यांनी मणिपूर मध्ये जाव्ो लोकांना विश्वास द्यावा,…

Read More

साईमत पुणे विवेक ठाकरे खास प्रतिनिधी – राज्यात शेतकरी हवालदिल असताना राज्यातील तब्बल २५ खत कंपन्यांची खते बोगस असल्याने कृषी विभागाने कारवाई सुरू केल्याची माहिती पुढे आली होती. तथापि समाज माध्यमांवर शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण केला जात असून सरसकट खते बोगस असतात असे नाही तर काही कंपन्यांच्या खतात असलेल्या मांत्रांचे प्रमाण कमी असल्याने अशी खते अप्रमाणित असतात,अशी स्पष्टोक्ती राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने ‘साईमत’ जवळ करण्यात आली.सद्द्याच्या हंगामात बोगस खतांच्या आवाईवर शेतकऱ्यांत असलेले भीतीचे वातावरण पाहता प्रस्तुत प्रतिनिधीने वास्तव जाणून घेण्यासाठी कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांच्याशी बातचीत केली. अप्रमाणित खत कंपन्यांवर कारवाई – शेतकरी ज्या टक्क्यांत…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्याचा दौरा करण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने ते जळगाव जिल्ह्यात येणार होते. त्यांच्या मुक्ताईनगर, पारोळा आणि धरणगाव या तीन ठिकाणी सभांचे नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. दरम्यान, आज शरद पवार हे पळासखेडा येथे दिवंगत कविवर्य ना. धो. महानोर यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले असता त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा केली. याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यात शरद पवार हे दि. 4 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची शहरातील सभा सागर पार्क मैदानावर आयोजीत…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव भाजप आघाडी सरकारने ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणेचा दृष्टतेने वापर करून देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे आता जनमानसात भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. तर महाराष्ट्रात भाजप-शिंदे सरकारसह राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्याविरोधी वातावरण निर्माण झाल्याने ‌‘काँग्रेसला राज्यात अनकुल वातावरण असल्याचे काँग्रेसचे पक्षनिरीक्षक डॉ.सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते जळगाव-रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शहरात आले होते. पत्रपरिषदेस यांची होती उपस्थिती गोदावरी इंजिनिअरिंग महाविद्यालयात बुधवारी रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर लागलीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेस माजी खासदार उल्हास पाटील, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, लोकसभा समन्वयक दीप चव्हाण, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ.अरविंद कोलते, जळगाव -रावेर मतदारसंघ…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी यावल येथे भाजपा युवा प्रदेश सचिव अमित सोळुंखे यांच्या उपस्थितीत भाजयुमोची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अमित सोळंखे यांनी अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. प्रसंगी किशोर कुलकर्णी यांनी अटलजी बद्दल आठवणींना उजाळा दिला. अमितजी सोळंखे यांनी सरल अँप, शाखा व कार्यकर्ते यांना संबोधित केले. बैठकीत तालुकाध्यक्ष सागर कोळी, व्यंकटेश बारी, तालुका सरचिटणीस योगेश खेवलकर , शहराध्यक्ष रितेश बारी , कुणाल कोल्हे, भूषण नेहेते, आकाश पाटील, तुषार चौधरी, रोहित पाटील, कोमल इंगडे, ईश्वर सपकाळे, नितीन सपकाळे, सोहम कोळंबे, सिद्धांत घारु, अविनाश बारी, प्रथमेश…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी शासन निर्णयानुसार यावल तालुक्यातील दिव्यांगांना सन 2018 ते 2023 या कालावधीतील 5% निधीसह 50% मालमत्ता करातून सुट, दिव्यांगांना विनाअट घरकुल मंजूर करणे यासह दि.25 जून 2018 च्या परीपत्रकानुसार सर्व सुविधा पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी दिल्यानंतर यावल तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने सुरू केलेल्या उपोषणाची सांगता केली. या प्रसंगी प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश चींधू पाटील, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा सल्लागार राजमल वाघ, उपजिल्हाध्यक्ष दिनेश सैमिरे, माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, अभिमन्यू चौधरी, प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष नंदु सोनवणे, सचिन झाल्टे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गोकुल कोळी, माजी नगरसेवक…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी शहीदांचे स्मरण करण्यासाठीच स्वातंत्र दिन असे भावनिक उद् गार ॲड. अर्जुन टी. पाटील यांनी काढले. ते येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित स्वातंत्र्यासाठी शहीदांचे स्मरण या विषयावर आपले विचार मांडतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच देशामध्ये न्यायाचे, व समतेचे राज्य आले त्यामुळेच घटनेची निर्मिती करण्यात आली.स्वातंत्र मिळाले म्हणुनच देश प्रजासत्ताक झाला. घटनेच्या सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. सरनाम्यातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षक, प्रजासत्ताक, गणराज्य या शब्दावरून असे दिसुन येते की, देशाची जनता ही सविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सार्वभौम झालेली आहे. देशातील कोणत्याही नागरीकाचे जिवीत, वैयक्तीक, आर्थिक स्वातंत्र कोणीही हिरावुन घेवु शकत नाही. हे…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी महाराणा प्रतापनगर मधील व शहरातील अनेक भाविक महिला,पुरुषांनी आज बुधवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी यावल शहरातून शेळगाव बॅरेज पर्यंत भव्य अशी कावड यात्रा काढून शेळगाव बॅरेज मधील ( पवित्र तापी नदी जलाशयातील गंगाजल ) पवित्र जल,जल कलश भरून आणून श्री महर्षी व्यास मंदिराजवळील अति प्राचीन जागृत अशा महादेव मंदिरात जलाभिषेक केला जाणार आहे. यामुळे संपूर्ण यावल शहरात अधिक मासाचा समारोप आणि श्रावण महिन्याचा शुभारंभ केला जाणार असल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Read More

साईमत यावल प्रतिनिधी यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मंगळवार दि.15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये स्वतंत्रता दिन साजरा करताना कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सैन्य दलात १८ वर्ष कार्यरत असलेले सूर्यभान पाटील, संस्था सदस्य शशिकांत फेगडे , शाळेतील पालक समितीचे सर्व सदस्य, शहरातील मान्यवर यांची उपस्थिती होती. सर्वात प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . तसेच राष्ट्रगीत म्हणून भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्य दिवस साजरा केला. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांनी ध्वजाला वंदन केले. विद्यार्थ्यांनी नृत्य व गायनाद्वारे आपले देशप्रेम व्यक्त केले. तसेच स्वतंत्र्य चळवळी चा इतिहास भारताची सद्यस्थिती व येणार्‍या भारताचे सुंदर चित्र रेखाटले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक पालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read More