यावल येथे भाजयुमोची बैठक उत्साहात

0
25

साईमत यावल प्रतिनिधी

यावल येथे भाजपा युवा प्रदेश सचिव अमित सोळुंखे यांच्या उपस्थितीत भाजयुमोची बैठक उत्साहात पार पडली.

यावेळी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अमित सोळंखे यांनी अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. प्रसंगी किशोर कुलकर्णी यांनी अटलजी बद्दल आठवणींना उजाळा दिला. अमितजी सोळंखे यांनी सरल अँप, शाखा व कार्यकर्ते यांना संबोधित केले.

बैठकीत तालुकाध्यक्ष सागर कोळी, व्यंकटेश बारी, तालुका सरचिटणीस योगेश खेवलकर , शहराध्यक्ष रितेश बारी , कुणाल कोल्हे, भूषण नेहेते, आकाश पाटील, तुषार चौधरी, रोहित पाटील, कोमल इंगडे, ईश्वर सपकाळे, नितीन सपकाळे, सोहम कोळंबे, सिद्धांत घारु, अविनाश बारी, प्रथमेश घोडके, सुजित वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश खेवळकर, आभार सोहम कोळंबे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here