रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढवणार

0
3

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

भाजप आघाडी सरकारने ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणेचा दृष्टतेने वापर करून देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे आता जनमानसात भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. तर महाराष्ट्रात भाजप-शिंदे सरकारसह राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्याविरोधी वातावरण निर्माण झाल्याने ‌‘काँग्रेसला राज्यात अनकुल वातावरण असल्याचे काँग्रेसचे पक्षनिरीक्षक डॉ.सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते जळगाव-रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शहरात आले होते.

पत्रपरिषदेस यांची होती उपस्थिती

गोदावरी इंजिनिअरिंग महाविद्यालयात बुधवारी रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर लागलीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेस माजी खासदार उल्हास पाटील, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, लोकसभा समन्वयक दीप चव्हाण, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ.अरविंद कोलते, जळगाव -रावेर मतदारसंघ समन्वयक प्रदेश सेक्रेटरी विनायक देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे, यावल शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, अल्पसंख्यांक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष मुनावर खान, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ.देशमुख म्हणाले की, रावेर मतदारसंघाच्या आढावा बैठकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसला या मतदारसंघात चांगले वातावरण आहे. भाजप आघाडी सरकारसह राज्यातील शिंदे सरकार व त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी विरोधी वातावरण झाले आहे. त्यामुळे रावेर मतदारसंघात काँग्रेसला अनकुल वातावरण असल्याने रावेरची जागा काँग्रेस लढवणार आहे. याबाबत बैठकीचा संपूर्ण तपशिल नाना पटोले यांना पाठवणार असून पुढचा निर्णय ते घेणार आहेत, असेही डॉ.देशमुख यांनी सांगितले.

काँग्रेस लोकसभेच्या 48 जागावर करतेय चाचपणी
महाराष्ट्रातील संपूर्ण लोकसभेच्या 48 जागांवर आढावा घेण्यात येत आहे. जेथे काँग्रेसला अनुकुल वातावरण असेल तेथील जागा काँग्रेस लढणार असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठक झाल्यावर त्या जागेबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेस सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here