भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला फरफटत नेले

0
23

साईमत, नंदूरबार : प्रतिनिधी

भरधाव व्ोगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर दुचाकीस्वाराला ट्रक चालकाने दूरपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील नंदुरबार रस्त्यावर सदर अपघात शुक्रवारी सकाळी घडला. शहादा नंदुरबार मार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला भरधाव व्ोगाने जाणाऱ्या ट्रकने फरफटत नेले. यात शहादा येथील मुसेब तेली या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातानंतर परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. यानंतर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक हा ट्रक घेऊन पसार झाला होता. मात्र पोलिसांनी सुमारे ६० किलोमीटर पाठलाग करीत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here