दुखापत बरी होण्यास व्ोळ लागतो तो काळ हा खूप निराशाजनक : बुमराह

0
3

साईमत, मुंबई : प्रतिनिधी

आयर्लंडविरुद्ध भारताच्या पहिल्या टी२० सामन्याच्या एक दिवस अगोदर जसप्रित बुमराह म्हणाला, जेव्हा दुखापत बरी होण्यास व्ोळ लागतो तेव्हा तो काळ हा खूप निराशाजनक असतो. मी स्वतःवर शंका घेण्याऐवजी तंदुरुस्त कसे व्हाव्ो आणि पुनरागमन कसे कराव्ो याचा विचार अधिक करत होतो. विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात पूर्ण १० षटके टाकण्यासाठी शरीराला व्ोळ आणि आराम देणे महत्त्वाचे होते. मी याला कधीही वाईट टप्पा म्हणून घेतले नाही. माझं करिअर संपलं असे मला एकदाही वाटलं नाही. मी या सर्व काळात माझ्या परिस्थितीवर उपाय शोधत होतो आणि जेव्हा उपाय सुचला तेव्हा माझ्या डोक्यातील विचार कमी झाले.

व्ोगवान गोलंदाज जसप्रीत पुढे म्हणाला, जेव्हा तुम्ही दुखापतीचा सामना करत असता, तेव्हा तुम्ही ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता, जग काय म्हणत याकडे फारसे लक्ष मी दिले नाही. मला त्यातून लवकरात लवकर सावरायचे होते. यातून तुम्ही खेळाचा अधिक आनंद घ्यायचा कसा, हे शिकतात. मी याकडे माझ्या आयुष्यातील वाईट काळ असे म्हणून पाहिले. तो काळ कुठल्या ना कुठल्या रुपात तुमच्यासमोर येतोच मात्र, त्याला तुम्ही कसे तोंड देता हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. त्याकाळात मला कुटुंबासोबत व्ोळ घालवण्याची संधी मिळाली. मी याकडे सकारात्मकतेने पाहिले. मी क्रिकेटपासून दूर राहिलो त्याव्ोळी माझ्या कुटुंबाने खूप सहकार्य केले. सहकाऱ्यांशी संवाद साधल्याने मला प्रेरणा मिळाली.”

बुमराह पुढे म्हणाला की, दुखापत बरी होण्यासाठी व्ोळ लागतो. मी एनसीएमध्ये अनेक खेळाडूंना भेटलो. काहीव्ोळा आयुष्यात घडणाऱ्या घटना तुमच्या नियंत्रणात नसतात. शरीराला सावरण्यासाठी व्ोळ लागतो आणि शरीराचा आदर करणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा तुम्हाला तीच खेळाप्रती काहीतरी चांगले करण्याची भूक असणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळता तेव्हा ऑफ-सीझन कसा असतो हे माहित नसते. या टप्प्यावर, माझ्या शारीरिक समस्या संपेपर्यंत, मला माझ्या फिटनेस आणि गोलंदाजीवर काम करायचे होते. संघाची कामगिरी कशी आहे हे मी पाहत होतो आणि खेळाडूंना भेटणे त्यांच्याशी बोलत राहणे यातून लवकर बरा झालो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here