तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत रोटवद, पळासखेडा मिराचे विजयी

0
3

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील लॉर्ड गणेशा स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे नुकत्याच तालुकास्तरीय शालेय शासकीय खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत १४ वर्ष मुले गटात दादासाहेब अ.चि. पाटील माध्यमिक विद्यालय, रोटवद तर १७ वर्ष मुले गटात नि. प. पाटील, पळासखेडा मिराचे विजयी ठरले आहेत. स्पर्धेत जामनेर तालुक्यातून १६ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‌‍‍घाटन लॉर्ड गणेशा स्कूलचे प्रशासकीय संचालक सतीश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटवद अ. चि.पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.ए.पाटील, तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, विकास पाटील, डी.आर.चौधरी, हरिभाऊ राऊत, के.आर.पाटील, झहीर खान, वसीम शेख, एस.व्ही.पाटील, साजिद तडवी, तुषार पाटील, क्रीडा शिक्षक आदी उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान लॉर्ड गणेशा स्कूलची विद्यार्थिनी सिमरा आसिफ खान (७ वी) राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून डी.बी.सूर्यवंशी, अनंतराव जाधव, कपिल शर्मा, दीपक चौधरी, नरेंद्र पाटील, प्रा.समीर घोडेस्वार तर गुणलेखक हर्षदा सूर्यवंशी, वेळाधिकारी सविता पवार यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन तथा आभार प्रा.समीर घोडेस्वार यांनी मानले. यशस्वीतेसाठी स्पर्धा समिती प्रमुख नरेंद्र पाटील, आनंद मोरे, अमोल भालेराव यांनी परिश्रम घेतले.

खो-खो संघाचा निकाल असा :
१४ वर्ष मुले – विजयी – दादासाहेब अ.चि. पाटील माध्यमिक विद्यालय, रोटवद, उपविजयी – नि. प. पाटील, पळासखेडा मिराचे, १७ वर्ष मुले-
विजयी – नि. प. पाटील, पळासखेडा मिराचे, उपविजयी- दादासाहेब अ.चि. पाटील माध्यमिक विद्यालय, रोटवद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here