Author: Saimat

साईमत, प्रतिनिधी, जळगाव जपानमधील वाकायामा येथे आशियाई आणि ओशनियन हायस्कूल विद्यार्थी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या ‘शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण परिषद’मध्ये भारतातर्फे एकमेव शाळा, अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूलचा विद्यार्थी, अतिशय जैन याने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत ‘भारतातील जल समस्या आणि त्यावरील उपाययोजना’ या विषयावर संशोधन सादर केले. या परिषदेत विविध 22 देशांतील शाळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यांत विद्यार्थी प्रतिनिधींद्वारे जागतिक पातळीवर होणारे बदल आणि त्याचा त्यांच्या देशातील वातावरण, भौगोलिक, पर्यावरण, शिक्षण आदी घटकांवर होणारे परिणाम आणि त्यावर करता येऊ शकणाऱ्या उपाययोजनांवर संशोधन सादर केली जातात. या परिषदेमध्ये अनुभूती स्कूलचा विद्यार्थी अतिशय जैन, शिक्षक स्वागत रथ यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव वाढदिवसानिमित्त केक कापून गोंधळ घालत पोलिसांवर दगडफेक करणारा फरार संशयित आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी रात्री मालेगाव येथून अटक केली. त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे १८ गुन्हे दाखल आहेत. शेख नईम उर्फ बुलेट शेख कलीम (वय २८, रा. मासुमवाडी, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील सम्राट कॉलनीत १७ मे २०२३ रोजी रात्री शेख जिशान शेख युनूस शिक्कलगर (वय १९) या तरुणाचा मासुमवाडीमध्ये ९ ते १० जण वाढदिवस साजरा करीत असताना त्यांनी एकमेकांवर अंडी फेकत सम्राट कॉलनीत घुसून एकमेकांशी वाद घालत होते. जमावबंदीचे आदेश असल्याने पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करून तेथे असलेल्या…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी अवसायनात निघालेल्या यावल-सावदा (ता.राव्ोर) येथील एका पतसंस्थेचा गाळा आणि अनामत रक्कम तक्रारदाराच्या नाव्ो करून देण्यासाठी पाच लाखाची लाच स्वीकारताना धुळे येथील सहकारी संस्थचे विशेष लेखापरीक्षक तथा संबंधित पतसंस्थेचे अवसायक सखाराम ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. धुळे मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. जळगाव भूविकास बँकेचे अतिरिक्त विशेष लेखा परीक्षक, धुळे येथे सहकारी संस्थाचे (प्रक्रिया) विशेष लेखा परीक्षक म्हणून काम पाहात आहेत. छत्रपती संभाजी राजे व्यापारी संकुलातील गाळा घेण्यास उत्सुक असलेल्या तक्रारदाराने ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. पतसंस्थेचा गाळा आणि गाळ्यासाठी भरण्यात आलेली सुरक्षा अनामत रक्कम आपल्या नाव्ो करून देण्याची प्रशासकीय प्रक्रिया…

Read More

साईमत, धुळे । प्रतिनिधी जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना झाली आहे. या समितीच्या संयुक्तिक पथकाने दुधात पाण्याची भेसळ आढळलेल्या आठ विक्रेत्यांवर गुरुवारी (ता. १७) कारवाई केली. समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न-औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, दुग्धव्यवसाय विभाग आदींच्या पथकातील अधिकारी संतोष कांबळे, डॉ. आर. एम. शिंदे, डॉ. अमित पाटील, संतोष दलाल, कृष्णा नेरकर, व्ही. व्ही. गरुड, प्रीतेश गोंधळी, हवालदार रवींद्र बेडसे, दूध तपासणी तंत्रज्ञ मनोज पाटील यांनी तपासणी केली.त्यांनी शहरातील चाळीसगाव रोड, ८० फुटी रोड, वडजाई रोड, पारोळा रोड, गल्ली नंबर ४,…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी राज्यभरात ओळख असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सची सलग दुसऱ्या दिवशीही ईडीकडून तपासणी सुरू होती. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत असलेल्या सहाशे कोटी रूपयांच्या कर्जा पोटी ईडी चौकशी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत ईडी अधिकाऱ्यांनी ज्व्ोलर्समधील सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन केले आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. त्यानंतर गाडीतून लोखंडी पेटी, पैसे मोजण्याचे मशिन आणि फाईली तपासणी अधिकाऱ्यांनी सोबत नेल्या. जळगाव शहरातील राजमल लखीचंद अर्थात आर एल समूहाच्या विविध आस्थापनांवर गुरुवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून एकाचव्ोळी सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात जळगावमधील आर एल ज्व्ोलर्स, मानराज आणि नेक्सा शोरूमचा समाव्ोश आहे. यासाठी मुंबई, नागपूर,…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी गौरी गणपती आणि दिवाळी या सणांसाठी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. हा शिधा १०० रुपयात वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेलाचा समाव्ोश असणार आहे. सर्वसामान्यांचे सण हे आनंदात जाव्ो, यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी देखील आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला होता. घाईत सरकारने एका संस्थेला ५१३ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. मागील वर्षी अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यंदा तरी हा शिधा सामान्यांच्या घरी व्ोळेवर पोहचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यातील केशरी आणि पिवळ्या…

Read More

साईमत, नंदूरबार : प्रतिनिधी भरधाव व्ोगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर दुचाकीस्वाराला ट्रक चालकाने दूरपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील नंदुरबार रस्त्यावर सदर अपघात शुक्रवारी सकाळी घडला. शहादा नंदुरबार मार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला भरधाव व्ोगाने जाणाऱ्या ट्रकने फरफटत नेले. यात शहादा येथील मुसेब तेली या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातानंतर परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. यानंतर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक हा ट्रक घेऊन पसार झाला…

Read More

साईमत धुळे । प्रतिनिधी येथील नंदिनी रवींद्र खैरनार(धोबी) वय 24, ह.मु. साईदर्शन कॉलनी, नकाणे रोड, देवपूर, धुळे हिने गुरुवारी (ता. 17) दुपारी बाराच्या सुमारास दभाशीजवळ तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिला उडी मारताना काही मासेमारी करणाऱ्यांनी पाहिले. त्यांनी तिला बाहेर काढले. मात्र ती मृत झाली होती. तिचे छायाचित्र व्हॉट्सॲपवर टाकण्यात आल्यानंतर पानसेमल (मध्य प्रदेश) येथील मामाने तिचे छायाचित्र पाहिले. तेव्हा नंदिनीबाबत उलगडा झाला. माहिती मिळताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.नंदिनीने नुकतीच सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळविली होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वडील रवींद्र सुकदेव खैरनार लॉन्ड्री व्यवसाय करतात. गरिबी असूनही मोठ्या मेहनतीने तिला सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले. गेल्या महिन्यापासून ती…

Read More

साईमत नंदुरबार : प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी दोन वर्षांपासून पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. त्याला आता यश मिळाले असून जिल्हा अमली पदार्थ मुक्त झाला आहे. त्याची घोषणा नाशिक विभागाचे विशेष पोलीस अधीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात सात हजार विद्यार्थ्यांनी एकाच व्ोळी अंमली पदार्थ मुक्त शपथ घेतली. राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची घोषणा करण्यात आली. जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने सोशल पोलिसिंग करून शाळा महाविद्यालयात जनजागृती केली. गावागावात जाऊन ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव करून गावागावात जनजागृती केली. त्यातून जिल्हा अमली पदार्थ मुक्त जिल्हा…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी आरोग्याच्या कोणत्याही सोयी सुविधा नसताना अनुभवाच्या जोरावर वयाच्या 90 वर्षात हजार बाळंतपण सुखरुप करण्याची किमया कापडणे येथील फुलाबाई झाल्टे यांनी केली. त्याचा विविध कार्यकारी संस्थेने स्वातंत्र्यदिनी ‘भुलेक पुरस्कार’ देवून सन्मानीत केले. आरोग्याच्या विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. शासन जनतेच्या आरोग्याची मोठी काळजी घेत आहे. महिलांचे बाळंतपण म्हणजे बाळासह आईचा पुनर्जन्मच असतो. बहुतेक बाळंतपणे रुग्णालयातच होत आहेत. ज्या काळी या सुविधा नव्हत्या तेव्हा फुलाबार्इंनी एकहाती हजारावर बाळंतपणे केली. सुईणपण निभावताना एकही बालक दगावले नाही. फुलाबाई दिसल्यावर त्यांना नतमस्तक होणारी शेकड्यावर तरुण आहेत. या फुलाबार्इंना वयाच्या नव्वदीत ‘भुलेक सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. येथील फुलाबाई झाल्टे यांचे वय…

Read More