सम्राट कॉलनीत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपीस मालेगावातून अटक

0
3

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

वाढदिवसानिमित्त केक कापून गोंधळ घालत पोलिसांवर दगडफेक करणारा फरार संशयित आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी रात्री मालेगाव येथून अटक केली. त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे १८ गुन्हे दाखल आहेत. शेख नईम उर्फ बुलेट शेख कलीम (वय २८, रा. मासुमवाडी, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
शहरातील सम्राट कॉलनीत १७ मे २०२३ रोजी रात्री शेख जिशान शेख युनूस शिक्कलगर (वय १९) या तरुणाचा मासुमवाडीमध्ये ९ ते १० जण वाढदिवस साजरा करीत असताना त्यांनी एकमेकांवर अंडी फेकत सम्राट कॉलनीत घुसून एकमेकांशी वाद घालत होते.

जमावबंदीचे आदेश असल्याने पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करून तेथे असलेल्या मालवाहू रिक्षा व दोन दुचाकींचे नुकसान केले होते. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पो.कॉ. छगन तायडे यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून शेख नईम शेख कलीम ( रा. मासुमवाडी) फरार होता. तो मालेगाव येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. तेथे पथक रवाना करून शेख नईम याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here