साईमत, जळगाव, पुणे : प्रतिनिधी राज्यात १७ ऑगस्टपासून महसूल खात्याअंतर्गत येणाऱ्या तलाठी पदाच्या चार हजार ६४४ जागांसाठी एका खासगी यंत्रणेच्या माध्यमातून तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार अर्ज आलेले आहेत. या परीक्षेत सोमवारी जळगाव, धुळे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला आदी जिल्ह्यांत नियोजित केंद्रांवर ऑनलाईन परीक्षेचं मुख्य सर्व्हर बंद पडल्याने परीक्षा तब्बल दोन तास उशीरा झाली. त्यामुळे इतर जिल्ह्यातून आलेल्या परीक्षार्थींना ताटकळत बसाव्ो लागले.खूप जणांची तारंबळ उडाली. परीक्षा तब्बल दोन तास पुढे ढकलण्यात आल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेला विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय…
Author: Saimat
साईमत, अमरावी/ जळगाव : प्रतिनिधी माहुली जहांगिर ते सालोरा खुर्द मार्गावरील अनंत वाढोकर याच्या शेतातील गोडावूनमधून पोलिसांनी सुमारे २.३९ कोटी रुपयांचा रासायनिक खतांचा साठा व ट्रक व अन्य साहित्य जप्त केले होते. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या त्या कारवाईदरम्यान माहुली पोलिसांनी दोन चालकांसह स्थानिक गोडाऊन किपर आणि शेतमालकाला अटक केली. उर्वरित आरोपींच्या शोधार्थ ग्रामीण पोलिसांचे पथक जळगाव जिल्ह्यात गेले असता, तेथील एका गावातील सेवा सहकारी सोसायटीच्या गोडाऊनमधून अमरावती पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी जळगाव पोलीस व कृषी विभागाच्या सहाय्याने रासायनिक खतांचा मोठा साठा जप्त केला. त्यामुळे रासायनिक खतांच्या अवैध साठवणुकीचे जळगाव कनेक्शन उघड झाले आहे. तत्पूर्वी, माहुली जहांगिर पोलिसांच्या पंचनाम्यानुसार तेथील गोडाऊनमधून…
साईमत, पुणे ः प्रतिनिधी पंधरा वर्षापासून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मानाचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती येथील कपिल जयप्रकाश जाचक असे पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सलग बावीस वर्ष निर्यातक्षम केळी उत्पादन घेणारा शेतकरी म्हणून इंदापूरच्या कपिल जाचक यांची ओळख आहे. जाचक यांनी त्यांच्या ज्ञानाचा फायदा इतर शेतकऱ्यांना करून दिला आहे. सोलापूर जिल्हा वगळता पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव कपिल जयप्रकाश जाचक यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सदर पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नुकतीच फायरलेस व थ्री कलर कॉल्ड कुकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पालक व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवत अनेक सुंदर व पौष्टिक पाककृती सादर केल्या. पाकशास्त्र निपुण प्रियंका बनवट व अपना राका यांनी स्पर्धेत परीक्षण केले. पालकांनी व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे अनेक चांगल्या रेसिपी यावेळी सादर केल्या. यात फळे, पालेभाज्या, दूध, बटर, मुरमुरे, बिस्कीट व टॉपिंग्ज अशा नानाविध पदार्थांचा सुरेख वापर करण्यात आला. यावेळी परीक्षाकांनी सर्व स्पर्धकांच्या रेसिपीचे कौतुक केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी हल्ली जंक फूडचा वाढता प्रभाव आहे. परंतु मुलांचे लहान वयात…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा नियोजन बैठकीत खेडी येथे अद्यावत वारकरी भवन उभारण्यासाठी 7 कोटी रुपयांचा ठराव करून या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील 51 ठिकाणांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थान आसोदा येथे बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाकडून 12 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याठिकाणी भव्य स्मारक साकारण्याचे काम बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश यावेळी ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिले. केळी विकास महामंडळाला हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी मांडला. या ठरावास सर्वानुमते मान्यता…
साईमत, नाशिक: प्रतिनिधी अधिक मासात लेक-जावयाला यथायोग्य पाहुणचार करण्याची परंपरा आहे. चांदीचे ताट, ताह्मण, निरांजन, गाय-वासरूची प्रतिकृती, दागिना देण्याची प्रथा आजही कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफ बाजारात महिन्याभरात कोटींची उलाढाल झालेली आहे. दर तीन वर्षांनी एकदा अधिक महिना येतो. या महिन्यात जावयाला घरी बोलावून पंचपक्वान्न जेवण देण्यासह विविध सोन्या-चांदीच्या वस्तूंची भेट देण्याची परंपरा आजही पाळली जाते. 18 जुलैपासून सुरू झालेल्या अधिक मासाचा शेवट 15 ऑगस्टला झाला. या काळात सराफा बाजाराला मोठी झळाली मिळालेली दिसली. चांदीचे ताट, ताह्मण, निरांजन, गाय-वासरू, ताट, भांडे, समई, चांदीचे दिव्ो, कॉइन, तसेच सोन्याची अंगठीची बाजारपेठेत चलती होती. अधिक मासात सराफ बाजारात झालेली उलाढाल श्रावणात कायम…
साईमत, नाशिक: प्रतिनिधी पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यानंतरही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन आदी पिके जागेवरच करपल्याने शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे खरेदी करण्याची व्ोळ आल्याचे चित्र जिल्ह्याभरात दिसून येत आहे. जिल्ह्यात खरिपाची 91.58 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जुलैअखेर खरिपाची पेरणी होते. त्यानंतर लेट खरीप व रब्बीचा हंगाम सुरू होतो. या काळात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.हा कांदा चांदवड, येवला, नांदगाव, मालेगाव या भागात मोठ्या प्रमाणात घेतला जातो. तर कळवण, देवळा, सटाणा या भागात लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची लागवड होते. लाल कांदा (पोळ) लागवडीयोग्य रोप तयार झालेले असले तरी अत्यल्प…
साईमत, इगतपुरी: प्रतिनिधी स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने चक्क घरासमोरच अंत्यविधी करण्यात आल्याचे आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने गावातील घरासमोरच अंत्यविधी करण्याची व्ोळ मृताच्या नातेवाईकांवर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण गावामधील ही घटना आहे. स्मशानभूमीकडे जाणारा नेहमीच्या वहिवाटीचा रस्ता स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे हा प्रसंग ओढावला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. गावातील मयत ध्रुपदाबाई चंदर सारुक्ते या महिलेचे 20ऑगस्ट रोजी निधन झाले. अंत्ययात्रा व अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीवर जाणारा रस्ताच स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे मृताच्या कुटुंबाने आपल्या राहत्या घरासमोर अंत्यविधी केला आहे. या गंभीर प्रकारास संपूर्णपणे ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे मृताच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. तसेच महसूल…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी कांदा दरवाढीच्या भीतीने केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असून विविध ठिकाणी शेतकऱ्यांसह राजकीय संघटनांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सुरत-शिर्डी महामार्ग रोखला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याव्ोळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारच्या शासकीय आदेशाची होळी देखील करण्यात आली. दरम्यान, याव्ोळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केंद्र सरकारला महागाई दर कमीच…
साईमत, जळगाव , प्रतिनिधी स्वत:चे आधी आत्मपरिक्षण करा. आपली शक्तीस्थाने, कमजोरी काय आहेत? दोन्ही जाणून घ्या. आपल्याला काय संधी आहेत आणि काय धोखे आहेत हे ही तपासा. त्यानंतर काय करायचे आहे त्याचा विचार करा. कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, नाऊमेद करणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याला बळी पडू नये. निसर्गाने प्रत्येकाला काही गुण दिलेले आहेत. नैराश्याचे शिकार होऊ नका, विफलतेची भावना मनात आणू नका. अयशस्वी झाल्यावर किंवा मागे पडल्यावर पक्षपात, अन्याय झाला – केला गेला, अशी भावना मनात येऊ शकते, अशा भावनांना अजिबात थारा देऊ नका. उलट जिगर दाखवा. यशस्वी व्यक्तीला यश का मिळाले? याचा अभ्यास…