बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताच्या रमेशबाबू प्रज्ञानंदचा पराभव

0
2

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचा युवा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदला फिडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नॉर्व्ोच्या मॅग्नस कार्लसनने टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला १.५-०.५ च्या फरकाने पराभूत केले होते. पहिल्या गेममध्ये पराभूत झाल्यानंतर प्रज्ञानंदला पुनरागमन करण्यात अपयश आले. दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीत शास्त्रीय फेरीचे दोन्ही गेम अनिर्णित ठेवले होते. त्यामुळेच त्यांच्यात टायब्रेकर सामना झाला.

प्रज्ञानंदने कार्लसनला हरवले असते तर २१ वर्षांनंतर भारतीयाला हे विजेतेपद मिळाले असते. पण तसे झाले नाही. यापूर्वी विश्वनाथन आनंदने २००२ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा प्रज्ञानंदचा जन्मही झाला नव्हता. वयाच्या ७व्या वर्षी जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप िंजकल्यानंतर प्रज्ञानंदचे नाव प्रथम प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्याला फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेक्स मास्टर ही पदवी मिळाली. वयाच्या १२ व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला आणि विजेतेपद मिळवणारा सर्वात तरुण भारतीय ठरला. या प्रकारात प्रज्ञानंदने भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदचा विक्रम मोडला. यापूर्वी २०१६ मध्ये यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर होण्याचा मानही त्याने पटकावला होता. तेव्हा तो फक्त १० वर्षांचा होता. ग्रँडमास्टर हे बुद्धिबळातील सर्वोच्च खेळाडू आहेत. या खालची श्रेणी आंतरराष्ट्रीय मास्टरची आहे.
वडील बँकेत काम करतात, आई गृहिणी
प्रज्ञानंद याचा जन्म १० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील स्टेट कॉर्पोरेशन बँकेत काम करतात, तर आई नागलक्ष्मी गृहिणी आहेत. त्याला एक मोठी बहीण वैशाली असून तीही बुद्धिबळ खेळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here