जळगावात वाळू माफियांवर प्रशासनाची कारवाई, ७० ब्रास वाळूसाठा जप्त

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

गिरणा नदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल व पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरु आहे.बुधवारी सायंकाळनंतर तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाकडून दापोरा शिवारातून सुमारे ७० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. प्रशिक्षणार्थी डीवायएसपी पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश वाघमारे यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात असल्याने, वाळू माफियांनी काही ठराविक भागांमधून वाळू उपसा बंद करून, आता दापोरा, नागझिरी या भागांतून उपसा केला जात आहे. त्यामुळे तालुका पोलिसांनी अनधिकृत वाळू उपशासह वाहतूक थांबविण्यासाठी रस्त्यांवर फिरते युनिट तयार केले आहे. बुधवारी दापोरा, धानोरा भागातील अनधिकृरीत्या वाळूचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागात कारवाई करण्यात आली.

वाळू माफियांनी लढवली नवीन शक्कल
वाळू माफियांकडून वाळू उपसा करण्याची आता नवीन शक्कल लढवण्यात आली आहे. एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा भागातून तराफ्याचा सहाय्याने थेट नदीच्या पाण्यातून वाळू उपसा करून, तो तरंगत्या बार्जद्वारे जळगाव तालुक्यातील धानोरा, दापोराकडे आणून त्या ठिकाणी वाळूचा साठा केला जातो. रात्रीच्या व्ोळेस डंपर व ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक केली जाते. याबाबतची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी धानोरा, दापोरा भागात जाऊन तराफा व ७० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. धानोरा भागातून वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर व बांभोरी भागातून रात्रीच्या व्ोळेस एक डंपर जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here