सप्टेंबरमध्ये चौदा दिवसात सरासरी एवढा पाऊस

0
4

साईमत, पुणे : प्रतिनिधी

यंदा जुलैत चांगला पाऊस झाला असला तरी ऑगस्टमध्ये हवा तसा पाऊस दिसत नाही. ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील परिस्थिती तशीच राहणार आहे. मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ८ सप्टेंबरपासून २१ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस पडत नसल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून परतीच्या वाटेवर असेल तर, शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार का, असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत कुठलाही अंदाज वर्तवलेला नाही. परतीच्या पावसाची सुरुवात ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. मात्र, सध्या तरी परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण नाही. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल, असे हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसळीकर यांनी सांगितले आहे.

नकाशे कसे समजून घ्यायचे?
उष्ण आणि शीत रंगांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. उष्ण रंग म्हणजे लालपासून पिवळ्या रंगांपर्यंत हे सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे सांगते.तर, शीत रंग निळा िंकवा गडद निळा रंग हे सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडेल, अशी शक्यता दर्शवतात. तर, पांढऱ्या रंगाचे तीन अर्थ असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here