Author: Saimat

साईमत, जळगाव , प्रतिनिधी  नाट्याशास्त्राचे शिक्षण घेण्याचे खान्देशातील तरूणांचे स्वप्न आता पूर्ण होणार असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. (नाट्यशास्त्र) हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू होत आहे. नाटक, सिनेमा, दूरचित्रवाणी या क्षेत्रात कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी वाढत असलेली संधी लक्षात घेवून विद्यापीठात नाट्यशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असावा, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. शहरातील नाट्यसंस्था व रंगकर्मींनी तशी मागणीदेखील यापूर्वी विद्यापीठाकडे निवेदनाव्दारे केली होती. रंगकर्मीच्या या भावना लक्षात घेवून कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या कला व मानव्यविद्या प्रशाळातंर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ परर्फामिंग आर्टस्‌‍‍ मध्ये एम. ए. नाट्यशास्त्र हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय…

Read More

साईमत, जळगाव,  प्रतिनिधी शहरातील आसोदा रोडवरील वाल्मीक नगरात असलेल्या घरकुल चौकात शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणासह त्यांच्या आईला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र भगवान सोनवणे (वय-३२) रा. वाल्मिक नगर, जळगाव हा श्याम तुकाराम सूर्यवंशी रा. घरकुल चौक, वाल्मिक नगर याला शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेला होता. यावेळी श्याम सूर्यवंशी याने राजेंद्र सोनवणे आणि त्याच्या आईला शिवीगाळ केली. त्यानंतर राजेंद्रला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी आसारी मारून दुखापत केली. या घटनेनंतर राजेंद्र सोनवणे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात…

Read More

साईमत,जळगाव,  प्रतिनिधी कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थीनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या झाडांना बांधून प्रेम व्यक्त केले. जवळजवळ ८० विद्यार्थीनींनी शालेय परिसरातील वेगवेगळ्या झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर, अनिल शेलकर यांनी केले होते. तसेच कार्यक्रमासाठी जे.एस.चौधरी, नरेश फेगडे, हर्षदा जगताप, वैशाली कोठावदे, पल्लवी पाटील, नीता पाटील, अर्चना कोठावदे यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक निकम, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम ज्येष्ठ शिक्षक एस.डी.भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी साळी समाजाचे आद्यदैवत आणि सृष्टीचे मूळ वस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्वर यांची जयंती मंगळवारी राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला सकाळी 6 वाजता भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास डहाके यांनी पोथी वाचन केले. सत्यनारायणाची पूजा सौरभ-दिव्या वाव्हळ आणि अभिषेक-कल्याणी आदमने या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज बांधव सुधाकर वाव्हळ होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष अरुण डहाके, विद्यमान अध्यक्ष राजु खेडकर, जिल्हाध्यक्ष अशोक दिवटे, कोषाध्यक्ष नाना भोगरे, सहसचिव पद्माकर आखडकर, नाना भागरे आदी उपस्थित होते. स्वागतगीत दीपाली खंडारे, नेहा खंडारे यांनी म्हटले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा हा जलजीवन मिशनमध्ये राज्यात पहिला तर देशात ६१ वा आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात जलजीवन मिशन ही योजना अंमलात आली आहे. याच्या अंतर्गत २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत नवीन निकषानुसार पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात ही योजना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदाची धुरा असणारे ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. या योजनेतून अगदी वाडी-वस्त्या आणि दुर्गम भागापर्यंत शुध्द पेयजल पोहचवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. या प्रयत्नांना आता फळ लाभल्याचे दिसून येत आहे. जलजीवन सर्वेक्षण-२०२३ अंतर्गत जलजीवन मिशनच्या…

Read More

साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी स्वराज्य प्रतिष्ठान आणि एन. डी. मराठे शैक्षणिक संकुल यांच्या वतीने सैनिकांना 2160 राख्या पाठविण्यात आल्या. घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र, कुठलाही सण नाही की उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, अशा उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहात असतात.. रक्षाबंधनानिमित्त स्वराज्य प्रतिष्ठान, शिंदखेडा संचालित अण्णासाहेब एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलातर्फे सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून ‘सैनिको हो तुमच्यासाठी..’ अशी भावना व्यक्त करीत आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे दाखवून दिले.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक, सुबक राख्या स्वतः तयार केल्या आणि सोबतच…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या गोराणे या एका छोट्याशा खेडेगावातील सर्वसामान्य रिक्षाचालकाच्या मुलाने आपली कल्पकता वापरून विविध प्रकारचे आकर्षक फिचर्स असणारी ’इलेक्ट्रीक बाईक’ तयार केली आहे. भूषण नंदू कदम असे या तरुणाचे नाव असून मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने फिजिक्स विषयातून आपली मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. परदेशात नोकरीची संधी उपलब्ध असतानाही त्याने भारतातच राहून देशासाठी काहीतरी ’इनोव्हेशन’ करायचे ठरवले. इंधनाचे वाढते दर आणि दुसरीकडे इंधनाची भासणारी टंचाई या बाबी डोळ्यासमोर ठेवून विविध कंपन्यांनी वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक बनविण्यावर भर दिला. जनतेचाही या बाईकला प्रतिसाद मिळू लागला. परिणामी आज मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक बाईक दिसू लागल्या…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या एनडीए युतीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे काम सुरु आहे. विरोधकांनी या आघाडीचे नाव इंडिया असे ठेवले आहे. या आघाडीची बैठक मुंबईत होत असताना आता एनडीएने देखील त्याच दिवशी मुंबईत बैठकीचे आय़ोजन केले आहे. ‌‘इंडीया‌’ची बैठक १ सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. तर राज्यातील एनडीएची बैठक १ सप्टेंबरलाच आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेचा एकनाथ िंशदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट सहभागी होणार आहे. प्रागतिक विकास मंच इंडियात जाणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत.…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी भुसावळ येथील भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. माजी मंत्री आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रव्ोश झाला. यामुळे भुसावळ शहरातील राष्ट्रवादीच्या खडसे गटाला मोठे िंखडार पडले आहे. पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यापूर्वी १७ डिसेंबर २०२१ रोजी भाजपच्या ९ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात पक्षप्रव्ोश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी घेतला होता. यात माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक ॲड. बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांचा…

Read More

साईमत,नंदूरबार : प्रतिनिधी तालुक्यातील आसाने गावातील रोहिदास ओंकार पाटील या शेतकऱ्याने कर्जबारी पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिला असून या आव्हानाला नंदुरबार तालुक्यातील आसाने या गावातील शेतकऱ्याला पेलता आला नाही. त्यामुळे या शेतकऱ्याने कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली.रोहिदास ओंकार पाटील या शेतकऱ्याने शेतातच जीवन संपवलं. युनियन बँक रनाळे या बँकेचा एक लाख वीस हजाराच्या कर्ज 2020 पासून होतं. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसामुळे अनेक संकट शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहणार आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार का नाही; अशी परिस्थिती उद्भवली असून अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेऊन पेरणी केल्या आहेत.…

Read More