साईमत,शिरपूर : प्रतिनिधी चाळीसगाव येथे एकला चिरडून महामार्गवरून पसार झालेल्या भरधाव ट्रॅकला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोलनाक्यावर ट्रकसह चालक व सहचालक दोघांना ताब्यात घेतल्याची कामगिरी शिरपूर महामार्ग पोलीसांनी केली आहे. संशयीत चालक जाव्ोद राजू खान (वय 24), सहचालक अरमान निसार खान (वय 18) रा देवानगरी हरियाणा यांच्यासह आरजे 11 जिसी 0513 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेत चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.सदर संशयीत भरधाव ट्रक बेंगलोरहून दिल्ली येथे चाळीसगावमार्गे नारळ भरुन जात असतांना 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील खडकी बायपासवर अशोक मगर या 65 वर्षीय व्यक्तीला चिरडून पसार झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या संशयीत ट्रकचा शोधकामी चाळीसगाव शहर पोलिसांकडून…
Author: Saimat
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मशिदीसमोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. यात चार जण या इमारती खाली अडकले होते. त्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले असून एक ७५ वर्ष वयाची महिला इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकली होती. तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पण ती वाचू शकली नाही. तिचा दबून मृत्यू झाला. राजश्री सुरेश पाठक असे त्या महिलेचं नाव आहे. बंद घरात पूजा करण्यासाठी आणि पाणी भरायला पाठक कुटुंबिय आले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. जळगाव शहरातील शिवाजी नगरात सुमारे ७० वर्ष जुनी इमारत आहे. पाठक कुटूंबियांची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये…
साईमत, तळोदा : प्रतिनिधी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी धडगाव येथे जात असताना तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची संवाद साधून चर्चा व इतर केले. प्रत्यक्षात मंत्री महोदयाशी चर्चा केल्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील भारावून गेले. शासकिय कार्यक्रमासाठी धडगाव येथे जात असताना रस्त्यालगत असणाऱ्या तळोदा तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली. याव्ोळी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, कोठार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे, आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याव्ोळी त्यांनी विद्यार्थ्यांशी…
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी भेट दिली आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, ओनम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना गिफ्ट दिले आहे. बुधवारपासून देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ७५ लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे.. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलेंडरही मोफत मिळेल. जगभरात गॅसच्या किमती वाढल्या आहेत,…
साईमत, धुळे : प्रतिनिधी तालुक्यातील धामणगांव येथे सालाबादाप्रमाणे तिथीनुसार श्रावण महिन्यात पोर्णिमेच्या एक दिवस अगोदर गोरक्षनाथ महाराजांची यात्रा भरते. या यात्रा महोत्सवानिमीत्त दि.29 ऑगस्ट रोजी विराट कुस्त्यांच्या सामान्याचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या सामनांचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे भाजपा युवानेते तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांच्याहस्ते पहिली मानाची कुस्ती लावून करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.धुळे तालुक्यातील धामणगांव येथे गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमीत अनेक वर्षापासून कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. ह्या कुस्त्यांसाठी व्ोल्हाणे, सावळीतांडा, बोरकुंड, शिरुडसह धुळे व जळगांव, मालेगांव जिल्ह्यातून पहेलवान (कुस्तीगीर) आलेले होते. सदर कुस्तींचा सामाना बघण्यासाठी धामणगांव पंचक्रोषीतील व धुळे तालुक्यातील कुस्तीशकिनांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती.…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी तालुक्यातील सारुळ, राजुर, बहुला आणि पिंपळद येथील बहुचर्चित 15 खाणपट्टांधारकांचे महाखनिज प्रणालीत ऑनलाईन वाहतूक परवाने बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सारूळ, राजुर, बहुला व पिंपळद या परिसरातील गौण खजिन उत्खननाचा विषय चांगलाच गाजत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने 21 खडी क्रशरवर कारवाई करीत ते बंद केले होते. परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन झाल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला होता. खडीक्रशर चालकांनी नियमांचे पालन केले नसल्याने ही कारवाई झाल्याचे सांगितले गेले. या कारवाई विरोधात क्रशरचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अपर जिल्हाधिकारी यांना सुनावणी घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब…
साईमत, सिन्नर : प्रतिनिधी वडांगळी ता.27 किर्तांगळी (ता.सिन्नर )येथे सुट्टीवर आलेल्या सैन्यदलातील जवानाचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. अमोल सखाराम चव्हाणके (वय 33) सैन्यदलात असल्याने सुट्टी आले.शनिवारी (ता.26) ला पत्नीसह त्र्यंबकेश्वरला जाऊन देवदर्शन करून आले. घरी कुटूंब सोबत असताना अमोलच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे अमोल तात्काळ किर्तांगळी येथून वडांगळीला मोटारसायकलने येत होते. वडांगळीच्या बसस्थानक परिसरात रस्त्यात पडले. अमोलला मित्रांनी डॉ माणिक अडसरे यांच्या दवाखान्यात दाखल केले. अमोलला घाम फुटला होता. त्यांनी खाजगी रुग्णवाहिका सिन्नरला पाठविले. सिन्नर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यांच्यावर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास किर्तांगळीला अंत्यसंस्कार करण्यात…
साईमत, त्र्यंबकेश्वर: प्रतिनिधी संगीत शिक्षणाचा गंध नव्हता, पण गायी चारताना बासरीतून गवसलेल्या सुरामुळे सावरपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे कलावंत घडले. इथल्या सनई-संबळ वाद्याला जिल्हाभरातून मागणी असते. शेतातील कामे झाली, की कलावंत पाड्यावरील मंदिरात एकत्र येतात. आता त्यांचा समूह तयार झाला आहे. त्यांचे सनई-संबळ लग्नसराईत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेले असते. रामदास राऊत, गणपत राऊत, गोविंद राऊत, गोपाल बोरसे हे संबळ वाजवतात. लवसू राऊत हे काडीचे गाणे सादर करतात. धर्मा राऊत ढोलकीवादन करतात. हे सर्व कलावंत साठी पार केलेले आहेत.लहानपणी जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्यावर बांबूपासून बासरी बनवत विविध गाणी वाजवत असत. त्यातून आवड वाढून त्यांना सूर सापडले आहेत. बोहाडामध्ये हे कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी यंदा पावसाने पाठ फिरवल्याने टंचाईला तोंड देण्यासाठी पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम देण्याचे नियोजन सुरू कराव्ो, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. खासदार हेमंत गोडसे, आमदार दिली दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 30 टक्केच पाऊस झाला, साधारण 92 पैकी 53 महसूल मंडळात 21 दिवसांचा खंड पडला आहे. 60 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. 41 गावात पेरण्याच झालेल्या नाहीत. पीक विमा उतरविलेला नाही अशा शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण नसेल म्हणून हा विषय शासनाकडे नेला…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लघुपाटबंधारे विभागाने बंधाऱ्यांच्या कामांच्या सुरक्षा अनामत रकमेच्या सादर केलेल्या 110 फायलींना पूर्ण झालेल्या कामांची छायाचित्रे नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नामंजूर केल्या.याशिवाय सुरक्षा अनामत रकमेच्या फायलींना कामांचे फोटो सक्तीचे करण्याचा निर्णय बैठकीत झाला. या निर्णयामुळे ठेकेदारांवर वचक राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघुपाटबंधारे विभागांतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कामांची सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतात.मात्र, अनेकदा कामांच्या तक्रारी असतात, कामे पूर्ण न करता ठेकेदार अनामत रक्कम काढण्याच्या मागे लागतात, असे प्रकार सरार्सपणे होत आहेत. यावर आता अकुंश येणार आहे.श्रीमती मित्तल यांनी सुरक्षा अनामत रक्कम काढण्याबाबत सादर होणाऱ्या फायलींना झालेल्या कामांचे फोटो…