कर्जाचा बोजा यात दुष्काळाचे सावट;

0
3

साईमत,नंदूरबार : प्रतिनिधी
तालुक्यातील आसाने गावातील रोहिदास ओंकार पाटील या शेतकऱ्याने कर्जबारी पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिला असून या आव्हानाला नंदुरबार तालुक्यातील आसाने या गावातील शेतकऱ्याला पेलता आला नाही. त्यामुळे या शेतकऱ्याने कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली.रोहिदास ओंकार पाटील या शेतकऱ्याने शेतातच जीवन संपवलं. युनियन बँक रनाळे या बँकेचा एक लाख वीस हजाराच्या कर्ज 2020 पासून होतं. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसामुळे अनेक संकट शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहणार आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार का नाही; अशी परिस्थिती उद्भवली असून अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेऊन पेरणी केल्या आहेत. परंतु शेतात काही पिकत नसल्याने कर्ज परत देणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही आहे. दुसरीकडे बँकेकडून वारंवार कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्‍न उपस्थित राहत आहेत. मात्र या शेतकऱ्यांनी अनेक मार्ग निघाले असते. परंतु शेवटी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे मायबाप सरकारने आता तरी शेतकऱ्यांच्या विचार करून दुष्काळ जाहीर करावा आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी एवढीच अपेक्षा आता गावकऱ्यांकडून होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here