साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी नरडाणा उद्योग वाढीसाठी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु मागील काळात सिमेंट कंपन्यांमुळे या भागातील विहीरींना लालसर पाणी येत असल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक कंपन्यांना विरोध केला आहे.भविष्यात या भागात कोणत्याही रासायनिक कंपन्यांनी उद्योग उभारू नयेत किंवा अशा त्रासदायक उद्योजकांना जागाच देवू नये, असा इशारा भाजपचे माजी तालुका अध्यक्ष नथा वारुळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योग उभारल्यास उद्योग मंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा इशारा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नथा वारुळे यांनी दिला आहे. नरडाणा औद्योगिक वसाहतीत शिंदखेडा तालुक्याची जमीन गेली आहे. उद्योग मंत्र्यांनी परस्पर कोणत्याही रासायनिक कंपनीला जागा दिलीच असेल तर…
Author: Saimat
साईमत, धुळे : प्रतिनिधी शहरातील ऐंशीफुटी रस्त्याची तत्काळ दुरूस्ती न केल्यास खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे (उबाठा) देण्यात आला. खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. अनेक वर्षापासून शहरातील ऐंशीफुटी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खासदार भामरे यांच्या निवासस्थानासमोरच खड्डे पडले आहे. पादचारी, वाहनधारकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात आणि इतरव्ोळीही खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. असे असतांना खासदारांना या रस्त्याची दुरुस्ती करावी, असे वाटत नाही का? असा प्रश्न निव्ोदनातून शिवसेनेचे माजी नगरसेवक पुरूषोत्तम जाधव, संदीप चौधरी, पंकज भारस्कर, आबा भडांगे आदींनी उपस्थित केला आहे.
साईमत, मालेगाव : प्रतिनिधी शिलेदार फाउंडेशन यांनी वडगाव येथील गरीब वस्तीत जाऊन तेथील महिलांना मदत व्हावी, या उद्देशाने अनोखे रक्षाबंधन साजरे केले. महिलांना साडी भेट देत, तेथील कुटुंबांना फरसाण, गोडधोडचे जेवण दिले. त्या कुटुंबातील महिलांना, त्यांच्या परिवाराला झालेला आनंद हाच शिलेदार फाउंडेशनकरिता प्रेरणादायी ठरला. रक्षाबंधन म्हणजे रक्षण आणि बंधन यांचा समन्वय होय. आपल्या हिंदू धर्मात या सणाला फार मोठे महत्त्व आहे. यात बहीण भावाला हाताच्या मनगटाला राखी बांधते अन् आपले रक्षण करण्याचे वचन भावाकडून घेते. हाच धागा पकडत समाजातील तळागाळातील वंचित लोकांना मदत व्हावी, हा प्रामाणिक हेतू ठेवून ‘शिलेदार फाउंडेशन, मालेगाव जे ‘वसा कतृत्वाचा’ हे ब्रीद घेऊन आपल्या कमाईतून काही…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी शहरातील६९ स्मार्ट शाळा दुपारच्या सत्रात भरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांच्या व्ोळेमध्ये सोमवारपासून बदल करण्यात आले आहेत. शाळांच्या व्ोळा सकाळच्या सत्रात करून दुपारनंतरचा संपूर्ण व्ोळ शिक्षकांना मोकळा मिळत असल्याने त्या व्ोळात शिक्षण देण्यासाठी उपयोग करता येणार असल्याने मनपा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाने सोमवारपासून शिक्षकांना दिवसभर आपली हजेरी शाळेत लावताना मोठी अडचण होताना दिसून आली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नाचा भाग म्हणून शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील यांनी नवनवीन उपक्रम शाळांची राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये विद्यादान करताना शिक्षकांकडून हात अखडता घेतला जात असल्याच्या तक्रारी तसेच शाळांची तपासणी करताना व्ोळेची येत असलेली अडचण लक्षात घेऊन सकाळच्या सत्रात भरणाऱ्या…
साईमत, त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी कळमुस्ते (ता. त्र्यंबकेश्वर) शिवारातील डोंगरगाव-दुगारवाडी गावाजवळ दमणगंगा खोऱ्यातील 690. 10 दशलक्ष घनफूट पाणी पावसाळ्यात गोदावरी खोऱ्यात 13. 68 किलोमीटर लांबीच्या बोगद्याव्दारे वळविण्याच्या 494 कोटी 98 लाख रुपये खर्चाच्या प्रवाही वळण योजनेला जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांमधून अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून गोदावरी खोऱ्यात 29.29 दशलक्ष घनफूट पाणी आणण्यासाठी चिमणपाडी (ता. दिंडोरी) प्रवाही वळण योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही योजना 36 कोटी 40 लाख रुपयांची आहे. जनहित याचिकेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयातील 23 प्रवाही योजनांमध्ये या दोन्ही प्रवाही वळण योजनांचा समाव्ोश आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या 25 फेब्रुवारी 2021 आणि 4…
साईमत, सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र या रस्त्यावर संगमनेर नाका ते बस स्थानक दरम्यान पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराकडून डांबर फवारण्यात आले होते. बुधवारी कडकडीत उन्हामुळे हे डांबर वितळून रस्ता निसरडा झाला व अनेक दुचाकी स्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या. सिन्नर शहरातून जाणाऱ्या या मार्गाच्या दुरुस्तीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. साडेआठ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कामाची गुणवत्ता खराब असल्याचे नागरिकांच्या तक्रारीतून वारंवार सांगण्यात आले. मात्र या दुरुस्ती कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेकडून…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी राज्यात गेल्या सात महिन्यांत सर्वाधिक 578 अपघाती मृत्यू नाशिकमध्ये झाले. महाराष्ट्रात रस्ता अपघातांत 15 हजार 224 मृत्यू झाले असून, देशात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. शहरांप्रमाणेच खेड्यापाड्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे पोहोचल्याने वाहनांची संख्याही वाढली. चकाचक रस्त्यांमुळे व्ोगही वाढला. परंतु, वाहन चालविताना वाहतूक नियमांचा जाणीवपूर्वक विसर पडल्याने अपघातांची संख्या व्ोगाने वाढत आहे. परिणामी, विशेषत: दुचाकी अपघाती मृत्युंमध्ये हेल्मेट न घातल्याने सर्वाधिक मृत्यू झाले. तर, समृद्धी महामार्गावरील अपघातातील 101 बळी हे मनुष्य चुकीमुळेच गेले आहेत. रस्ता अपघातांत बळी जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. जगभरातील रस्ता अपघातांत वर्षाला 13 लाख मृत्युमुखी पडतात, तर भारतात एक लाख 53 हजार…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय अशोक नगर सातपूर, या शाळेत रक्षाबंधन निमित्त पर्यावरण पूरक राखी ’माननीय मुख्याध्यापक डॉ. अनिल माळी व कलाशिक्षक चंदर मिरके यांच्या संकल्पनेतून वापरलेल्या विविध रंगांच्या साड्यानं पासून भव्य राखी तयार करण्यात आली.यासाठी विद्यार्थ्यांनी साड्यांचे संकलन केले. राखीचा व्यास 32 फूट एकूण लांबी 120 फूट तसेच जवळजवळ 80 साड्यांचा वापर करून भव्य अशी पर्यावरणपूरकराखी तयार करण्यात आली. इयत्ता आठवीतील विद्यार्थी संकेत गोपाळ, रणवीर पाटील, हर्षद बोरसे, प्रणव पाटील, अश्विनी वाघ, शिवानी बेडसे, करण निकम, आर्यन सूर्यवंशी, व्ोदांत सांगळे, प्रणव वानखेडे, ज्ञानेश बोरसे, सौरभ कदम, पार्थ अहिरराव व शाळेतील शिक्षक योगेश ओहोळ, संदीप…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहर व जिल्हा सेपक टकारॉ असोसिएशनतर्फे जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल याठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. या वेळी हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू इक्बाल मिर्झा यांनी ‘मेजर ध्यानचंदच्या हॉकीमध्ये योगदान’ याविषयी सर्व उपस्थित खेळाडूंना माहिती दिली. स्पर्धा 17 वर्ष आतील व 19 वर्षा आतील अश्ाा दोन गटात घेण्यात आली. सदर स्पर्धेत आठ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कूलच्या दोन्ही संघ विजयी राहिले. विजयी व उपविजयी तसेच उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, इकबाल मिर्झा, प्रविण पाटील, प्रा. वसीम…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी जिल्हा कारागृहातील बंदी बांधवांना नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली. न्यायबंदी हे वेगवेगळ्या ठिकाणचे असून छोट्या- मोठ्या गुन्ह्याबद्दल जिल्हा कारागृहात बंदी असून ते आपल्या घरापासून दूर आहेत. त्यांचे अशा सामाजिक उपक्रमाने मनपरिवर्तन होण्यास मोठे सहकार्य होईल, या भावनेतून अध्यक्षा मनिषा पाटील यांच्यासोबत संस्थेच्या सचिव श्रीमती ज्योती राणे व कार्याध्यक्ष नूतन तासखेडकर यांनी न्यायबंदी बांधवांना राख्या बांधल्या. याप्रसंगी अहोरात्र कर्तव्यावर असणारे अधीक्षक वाढेकर साहेब, तुरुंगाधिकारी कंवर साहेब, अनिल पाटील, गजानन पाटील, जेल सुभेदार , नेवाडे हवालदार आदी पोलीस बांधव व पोलीस कर्मचाऱ्यांना देखील राख्या बांधण्यात आल्या.