वाल्मीक नगरातील तरुणास किरकोळ कारणावरून बेदम मारहाण

0
9

 

साईमत, जळगाव,  प्रतिनिधी

शहरातील आसोदा रोडवरील वाल्मीक नगरात असलेल्या घरकुल चौकात शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणासह त्यांच्या आईला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र भगवान सोनवणे (वय-३२) रा. वाल्मिक नगर, जळगाव हा श्याम तुकाराम सूर्यवंशी रा. घरकुल चौक, वाल्मिक नगर याला शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेला होता. यावेळी श्याम सूर्यवंशी याने राजेंद्र सोनवणे आणि त्याच्या आईला शिवीगाळ केली. त्यानंतर राजेंद्रला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी आसारी मारून दुखापत केली. या घटनेनंतर राजेंद्र सोनवणे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंंद्र बोदवडे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here