भगीरथ स्कूलमध्ये झाडांना बांधल्या राख्या

0
1

साईमत,जळगाव,  प्रतिनिधी
कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थीनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या झाडांना बांधून प्रेम व्यक्त केले. जवळजवळ ८० विद्यार्थीनींनी शालेय परिसरातील वेगवेगळ्या झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर, अनिल शेलकर यांनी केले होते. तसेच कार्यक्रमासाठी जे.एस.चौधरी, नरेश फेगडे, हर्षदा जगताप, वैशाली कोठावदे, पल्लवी पाटील, नीता पाटील, अर्चना कोठावदे यांचे योगदान लाभले.

कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक निकम, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम ज्येष्ठ शिक्षक एस.डी.भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here