साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एनडीएकडून पुढील पंतप्रधान पदाचा चेहरा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहेत तर, इंडिया आघाडीतून पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांचें नाव पुढे आले आहे. इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार,असा प्रश्न सातत्याने एनडीएतील घटकपक्षातून विचारला जात होता मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार राहुल गांधी असतील अशी माहिती दिली. दरम्यान, इंडिया आघाडीत विविध विचारधारा असलेले अनेक पक्ष सामील आहेत. यामध्ये आम आदमी पक्षानेही सहभाग घेतला आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने आपच्या मुख्य प्रवया प्रियंंका कक्कर…
Author: Saimat
साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था संसदीय कामकाजात व्यत्यय आणल्याच्या आणि देशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना तीन आठवड्यांपूर्वी लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. विशेषाधिकार समिती याप्रकरणी निर्णय घेईपर्यंत चौधरी निलंबित राहतील असे त्याव्ोळी सांगण्यात आले होते. दरम्यान, लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द केले आहे. हे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्याला मोठा दिलासा मिळाला आहे. संसदीय कामकाज मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रल्हाद जोशी यांनी १० ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिव्ोशनादरम्यान अधीर रंजन चौधरी यांच्या…
साईमत, लखनऊ ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अर्थात इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, तृणमूलसह अनेक मोठ्या व प्रमुख विरोधी पक्षांचाही समाव्ोश आहे. उत्तर प्रदेशमधील राजकीय सत्तासमीकरणे लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरतात. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून विरोधकांच्या आघाडीला किती पाठिंबा मिळतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील एक महत्त्वाचा विरोधी पक्ष असणाऱ्या बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील दुसरा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या सपाने इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी इंडिया आघाडीची आज (३१ ऑगस्ट) मुंबईत बैठक होत आहे.या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार, जागा वाटप कसे होणार,संयोजक कोण असणार या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान आजच्या बैठकीत इंडिया आघाडीचा सामुहिक कार्यक्रम,संयोजकाची नियुक्ती याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.या बैठकीला देशभरातील २८ पक्षांचे नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. या बैठकीची माहिती देण्याकरता महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्याव्ोळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला…
साईमत, धुळे: प्रतिनिधी देवपूर भागातील वडेल रोडवरील पोलीस कॉलनीत चोरट्यांनी बंद घर फोडून रोकड आणि दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली.पोलीस कॉलनीत बांधकाम विभागात उपअभियंता राहुल बापू जाधव यांचे सद्गुरू कृपा नामक निवासस्थान आहे. राहूल जाधव यांची मुंबई येथे बदली झाली आहे. त्यामुळे रविवारी ते कुटुंबीयांसह मुंबई येथे गेले.रक्षाबंधन असल्याने त्यांची पत्नी नाशिकला माहेरी थांबली. बंद घराची संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रव्ोश केला. कपाटाचा दरवाजा तोडून सोन्याचे दागिने आणि १२ ते १५ हजारांची रोकड लंपास केली. राहूल जाधव यांच्या शेजारील निवृत्त पोलिस विजय गुरव यांच्या लक्षात ही घरफोडी आली.…
साईमत, नवापूर-प्रतिनिधी जि.प.शाळा थुवा येथे रक्षाबंधन सणानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या .त्यामध्ये सजावटीसाठी व्ोगव्ोगळ्या बियांचा वापर करून“ एक मुल एक झाड-एक राखी“ हा उपक्रम राबविण्यात आला. बियांचा वापर केल्यामुळे राखी पाण्यात विसर्जन केली किंवा इतर ठिकाणी पडल्यास बियांपासून वृक्षनिर्मिती होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राखी तयार करण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः जे झाड लावले त्याच्या रक्षणाची जबाबदारी झाडाला राखी बांधून उचलली. त्यानंतर सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधल्या मुलांनी मुलींना त्याबदल्यात भेट दिली. रक्षाबंधन सणाविषयी प्रतिज्ञा कविता पाटील यांनी स्वतः लिहून मुलांकडून म्हणून घेतली. या सर्व कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन कविता पाटील यांनी केले. व कार्यक्रमासाठी प्रेरणास्रोत म्हणून…
साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील महिला कर्मचाऱ्यांतर्फे जिल्ह्यातून हजारो राख्या पाठविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन नंदुरबारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना राखी पाठवीत ‘भाऊराया, जुनी पेन्शनच्या रूपाने ओवाळणी दे..!’ अशी साद महिला भगिनींनी घातली आहे. कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या जुन्या पेन्शनचा विषय मागील काळात चांगलाच गाजला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारी नोकरदार आक्रमक झालेले आहेत आणि सरकारला शेवटी आपली भूमिका सोडावी लागली व फॅमिली पेन्शन लागू करत जुन्या पेन्शनचा विषय सरकारने निकाली लावला. मात्र २००५ नंतर शासकीय सेव्ोत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनचा प्रश्न महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून रेटून…
साईमत, शिरपुर : प्रतिनिधी शहादा रस्त्यावर वरूळ शिवारात न्यु तारा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वरुळ येथील २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे घडली .याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कैलास आत्माराम मराठे (वय २५) रा. वरूळ ता. शिरपुर असे अपघातात मयत तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील वरूळ येथे कैलास आत्माराम मराठे हा तरुण सोमवारी रात्री राहत्या घराच्या अंगणात झोपला होता. रात्री डासांचा त्रास होत असल्याने तो मंगळवारी पहाटे साडे तीन चार वाजेच्या सुमारास वडिलांना रस्त्यावर पायी फिरण्यासाठी उठून निघाला. याबाबत त्याने वडिलांना सांगितले आणि शिरपुर शहादा रस्त्यावरून पायी जात…
साईमत, शिरपुर : प्रतिनिधी तालुक्यातील सावळदे लगत तापी नदी पुलाववरून एका अनोळखी वृद्ध व्यक्तीने तापी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यावेळी प्रवाशांनी पुलावर गर्दी केली होती. तालुक्यातील सावळदे येथील तापी नदी पुलावर मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तापी पुलावरून एका अनोळखी व्यक्तीने नदी पात्रात उडी घेतली. सदर वृध्दास उडी घेतांना काही प्रवाश्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी थांबविण्याचे प्रयत्न केले मात्र पाण्यात पडल्यानंतर काही काळ वृद्ध पाण्यावर तंरगतांना आढळून आला.पण काही व्ोळाने पाण्यात बुडाल्याने त्याचा तपास लागू शकला नाही. पुलावरून काही नागरिकांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती दिल्याने पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र वृद्धाबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही.…
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी धडगाव तालुक्यातील चांदसैली माळ येथे महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ रोजी दुपारी महिलेने पती आणि मुलाकडून सतत होणाऱ्याला त्रासाला कंटाळून घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.कांतीबाई ब्रिजलाल वळवी (४५) रा. चांदसैली माळ असे मयत महिलेचे नाव आहे. कांतीबाई यांचा पती ब्रिजलाल वळवी (५०) हा वर्षभरापासून दुसरा विवाह करावयाचा असल्याने छळ करत होता. पत्नी कांतीबाई हिने घर सोडून निघून जाव्ो, असे त्याचे म्हणणे होते. दरम्यान, मुलगा सोहम (२५) हादेखील महिलेला त्रास देत होता. यातून पती आणि मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून कांतीबाई वळवी यांनी २५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती.…