मनपाच्या ६९ स्मार्ट शाळा भरतात दुपारच्या सत्रात

0
4

साईमत, नाशिक : प्रतिनिधी
शहरातील६९ स्मार्ट शाळा दुपारच्या सत्रात भरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांच्या व्ोळेमध्ये सोमवारपासून बदल करण्यात आले आहेत. शाळांच्या व्ोळा सकाळच्या सत्रात करून दुपारनंतरचा संपूर्ण व्ोळ शिक्षकांना मोकळा मिळत असल्याने त्या व्ोळात शिक्षण देण्यासाठी उपयोग करता येणार असल्याने मनपा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाने सोमवारपासून शिक्षकांना दिवसभर आपली हजेरी शाळेत लावताना मोठी अडचण होताना दिसून आली.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नाचा भाग म्हणून शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील यांनी नवनवीन उपक्रम शाळांची राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये विद्यादान करताना शिक्षकांकडून हात अखडता घेतला जात असल्याच्या तक्रारी तसेच शाळांची तपासणी करताना व्ोळेची येत असलेली अडचण लक्षात घेऊन सकाळच्या सत्रात भरणाऱ्या सर्व शाळा दुपारच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ६९ शाळा दुपारच्या सत्रात भरवण्यात येत आहेत. काही शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या पुढाऱ्यांनी या निर्णयास विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे सोमवारी दिवसभर मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना भेटणाऱ्यांची गर्दीदेखील कमी झाल्याचे आढळून आले. या आदेशाचे पालन तपासण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक दुपारी काही शाळांना भेटी देऊन पाहणी केली आहे.सकाळी शाळेची सवय असलेल्यांना जास्त त्रास होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सकाळच्या सत्रातील शाळांची सवय जडलेल्या शिक्षकांना हा निर्णय बऱ्याच प्रमाणात अडचणीचा ठरलेला आहे. अनेक शिक्षकांचे शाळेच्या व्ोळांव्यतिरिक्त अन्य उद्योग नियोजित केलेले असून, दुपारनंतर ते त्यासाठी मोकळा व्ोळ देत होते. याशिवाय शिक्षक संघटनेचे पुढारी दुपारनंतर महपालिकेत घिरट्या घालत होते. त्यांना आता शाळांमध्ये ठाण मांडाव्ो लागणार असल्याने त्यांच्या इतर उद्योगांना पायबंद बसणार आहे. त्यातून शाळेतील अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असा विश्‍वास शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here