साईमत, जळगाव, प्रतिनिधी
जिल्हा कारागृहातील बंदी बांधवांना नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली. न्यायबंदी हे वेगवेगळ्या ठिकाणचे असून छोट्या- मोठ्या गुन्ह्याबद्दल जिल्हा कारागृहात बंदी असून ते आपल्या घरापासून दूर आहेत. त्यांचे अशा सामाजिक उपक्रमाने मनपरिवर्तन होण्यास मोठे सहकार्य होईल,
या भावनेतून अध्यक्षा मनिषा पाटील यांच्यासोबत संस्थेच्या सचिव श्रीमती ज्योती राणे व कार्याध्यक्ष नूतन तासखेडकर यांनी न्यायबंदी बांधवांना राख्या बांधल्या. याप्रसंगी अहोरात्र कर्तव्यावर असणारे अधीक्षक वाढेकर साहेब, तुरुंगाधिकारी कंवर साहेब, अनिल पाटील, गजानन पाटील, जेल सुभेदार , नेवाडे हवालदार आदी पोलीस बांधव व पोलीस कर्मचाऱ्यांना देखील राख्या बांधण्यात आल्या.