Author: saimat

महापुरुषांच्या कार्याची उजळणी नव्या पिढीला दिला संदेश साईमत जळगाव प्रतिनिधी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री संत सावता माळी पंच मंडळाच्या वतीने संयुक्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता, शिक्षण आणि स्वराज्याचा संदेश देणाऱ्या या दोन महान विभूतींच्या कार्याची उपस्थितांनी यावेळी उजळणी केली. त्यांच्या विचारांमुळे समाजाला दिशा मिळाली असून आजच्या पिढीने त्यांचे आदर्श आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत…

Read More

हॉटेल सायलीजवळ टोळक्याचा हल्ला; वाहन फोडून सपकाळेंना मारहाण साईमत जळगाव प्रतिनिधी शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बॅनरच्या किरकोळ वादातून थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत मजल गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल) दुपारी उघडकीस आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद सपकाळे हे दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉप येथून रिंग रोडमार्गे बहिणाबाई उद्यान चौकाच्या दिशेने आपल्या चारचाकी वाहनाने जात होते. याच दरम्यान, हॉटेल सायली परिसरात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांच्या टोळक्याने त्यांचा मार्ग अडवला. बॅनर छपाईच्या वादातून…

Read More

महापौरांच्या मध्यस्थीने २५ लाखांचा तातडीचा भरणा, न्यायालयाची कारवाई थांबली साईमत जळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेत आज मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत असताना आयुक्तांच्या खुर्ची व शासकीय वाहन जप्त होण्याचा गंभीर प्रसंग अखेर टळला. महापौर दिपमाला काळे यांच्या तातडीच्या मध्यस्थीमुळे तब्बल २५ लाख रुपयांचा भरणा करण्याचे आश्वासन देण्यात आले आणि न्यायालयाच्या जप्ती कारवाईला तूर्तास स्थगिती मिळाली. शिवाजी नगर परिसरातील मेहता यांच्या जमिनीचा भूसंपादन मोबदला पंधरा ते वीस वर्षांपूर्वी महापालिकेने विकासकामांसाठी घेतलेल्या जमिनीबाबत प्रलंबित होता. न्यायालयाने चार वर्षांपूर्वीच मोबदला देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, वारंवार मुदत देऊनही महापालिकेकडून थकीत रक्कम जमा न झाल्याने प्रकरण गंभीर बनले होते. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे अखेर न्यायालयाने जप्तीचे वॉरंट…

Read More

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; ५८३ नागरिकांची नोंदणी, २३५ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया साईमत /पाळधी (ता. धरणगाव)/ प्रतिनिधी “डोळ्यांना दृष्टी देणे म्हणजे केवळ वैद्यकीय उपचार नव्हे, तर एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचा दिवा पेटवणे आहे. गरीब आणि वंचितांच्या जीवनात प्रकाश आणणे हेच खरे समाजकार्य आहे,” असे भावपूर्ण प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे आयोजित भव्य दृष्टीदान उपक्रमात केले. समाजसेवेचा खरा अर्थ म्हणजे गरजूंना नवजीवन देणे, हा संदेश घेऊन पाळधीत “दृष्टीदानाचा महायज्ञ” उत्साहात पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील…

Read More

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत सविस्तर आढावा; पारदर्शक वितरणावर भर साईमत जळगाव प्रतिनिधी आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रोहन घुगे होते. बैठकीत जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, वितरण व्यवस्था सुरळीत राहावी आणि कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्याला मागणीपेक्षा अधिक खत पुरवठ्याचा कोटा मंजूर झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी सादर केली. त्यांनी जिल्ह्यातील खत पुरवठा नियोजन, साठा व्यवस्थापन आणि वितरण यंत्रणेची सविस्तर माहिती दिली.…

Read More

राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून डीबीटीद्वारे थेट लाभ; अंगणवाडी नोंदणीला मोठा प्रतिसाद साईमत / जळगांव राज्य सरकारच्या ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६५१ मुलींच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत ही रक्कम थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे वितरित करण्यात आली असून, जिल्ह्यात एकूण १ कोटी ३२ लाख ५५ हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. १ एप्रिल २०२३ पासून राज्यात सुरू करण्यात आलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेचा उद्देश मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे. या योजनेअंतर्गत मुलीला…

Read More

चौक-दुभाजक सुशोभीकरणासाठी महापौरांचे कडक निर्देश साईमत जळगाव प्रतिनिधी शहराच्या सौंदर्यीकरणाला गती देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला ठोस आणि कडक निर्देश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख चौक आणि दुभाजकांचे (डिवायडर) सुशोभीकरण पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले असून, कामांमध्ये विलंब करणाऱ्या विकासकांना थेट अल्टिमेटम देण्यात आला आहे. गुरुवारी (९ एप्रिल) महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली शहर सौंदर्यीकरणासंदर्भात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि दुभाजकांच्या डिझाईन, अंमलबजावणी आणि देखभालीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. शहर सौंदर्यीकरणात एकरूपतेवर भर या बैठकीत महापौरांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, शहरातील प्रत्येक चौक आणि दुभाजक सुशोभित करताना त्यामध्ये एकसमानता (सिमिलॅरिटी) आणि ठराविक…

Read More

 हृदयद्रावक घटना; आजोबांच्या संशयामुळे उघडकीस आले थरारक सत्य साईमत / पुणे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी परिसरात 6 वर्षीय चिमुकल्याच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने आईने आपल्या प्रियकराच्या मदतीनेच मुलाची हत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 27 वर्षीय बसरिन शेख हिचे विनायक कजेवाड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या चार महिन्यांपासून दोघेही कुरुळी येथे एकत्र राहत होते. मात्र बसरिनचा 6 वर्षांचा मुलगा आवेज हा त्यांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याचे मानले जात होते. याच कारणातून 4 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजता आईने प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीने मुलाचा जीव घेतला. प्रथम…

Read More

शासकीय धान्य खरेदीसाठी टोकन वाटप सुरू असल्याची चुकीची माहिती पसरल्याने गोंधळ पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात साईमत भडगाव प्रतिनिधी शासकीय धान्य खरेदीसाठी टोकन मिळणार असल्याच्या अफवेने भडगाव शहरात सोमवारी सकाळपासूनच मोठी खळबळ उडाली. कोणतीही अधिकृत घोषणा किंवा आदेश नसतानाही शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रावर धाव घेतल्याने परिसरात प्रचंड गर्दी उसळली. काही वेळातच केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आणि संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी संघाकडून टोकन वाटप सुरू झाल्याची चुकीची माहिती ग्रामीण भागात वेगाने पसरली. परिणामी, आपल्या धान्याच्या विक्रीच्या आशेने अनेक शेतकरी सकाळपासूनच केंद्रावर दाखल झाले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही टोकन प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण पसरले.…

Read More

साईमत / जळगांव डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असताना ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत असल्याचे चित्र आहे. यावर आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून UPI आणि IMPS व्यवहारांबाबत महत्त्वाचा बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावानुसार 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा UPI किंवा IMPS व्यवहार केल्यास पैसे लगेच समोरच्या खात्यात जमा न होता सुमारे एक तासाचा ‘कूलिंग ऑफ पीरियड’ लागू होऊ शकतो. या कालावधीत व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी वेळ मिळेल. संशय आल्यास व्यवहार रद्द करण्याची सुविधाही उपलब्ध असू शकते. देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, 2026 पर्यंत अशा फसवणुकीची रक्कम 22,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बहुतांश…

Read More