Author: saimat

बोदवड ः प्रतिनिधी बोदवड-सोनोटी येथील शिक्षक मुरलीधर पाटील यांंच्या मुलीचे पाच वर्षापुर्वी १८ वर्षी निधन झाले.या दुःखातून सावरत पाटील परिवाराने मुलीच्या नावाने स्व.प्रियंका पाटील बहुऊद्देशिय संस्था स्थापना केली व संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी स्मृतीदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करतात. यावर्षी सोनोटी गावात दिव्यांग बांधवांना, दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनेची माहिती संस्था अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी दिली तसेच कपडे वाटपही करण्यात आले. यावेळी मधुकर राणे,अनिल पाटील, सोपान पाटील, संगीता पाटील, राजेश ननवानी आदींची उपस्थिती होती.

Read More

यावल ः प्रतिनिधी यावल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत डोणगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत सातपुडा माध्यमिक विद्यालय नायगाव येथील दोन विद्यार्थी डिगंबर रविंद्र ठाकरे(१४ वर्षे वयोगट)व मयूर पंकज नन्नवरे(१७ वर्षे वयोगट)यांनी कुस्ती स्पर्धेत विशेष यश प्राप्त केले. या यशाबद्दल त्यांंचे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मानद सचिव तसेच अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, स्कूल कमिटी चेअरमन व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक वाय.एम.नायदे सर,क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

जळगाव जामोद ः प्रतिनिधी तालुक्यातील पडशी सुपो येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उदयन विद्या महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी रावे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम या अंतर्गत गावातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम यशस्वी केला आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील आपल्या दिलेल्या अंंधश्रद्धा,रूढी परंपरेच्या नुकसानाबाबत समजावून त्यांंना त्यांच्या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्राजक्ता बोंबटकार व सचिव प्रमिला बोंबटकर या होत्या.यावेळी महिला मंडळाच्या इतर सदस्या व गावकरी तसेच उद्यान विद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनुराग नारखेडे,आदित्य पाटील,सुरज मुंडे, सुचित मसाज,कृष्णा सूर्यवंशी,रोहित महाले यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतीश धर्माळ,कार्यक्रमाधिकारी प्रा.प्रितेश वानखेडे व विषय…

Read More

बोदवड ः प्रतिनिधी तालुक्यातील नाडगाव ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकलेला दिसून येत आहे. श्रीमती अश्विनी नरेंंद्र कुरपाडे या शिवसेना शिंदे गटाच्या महिला सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर श्रीमती कविता श्रीकृष्ण लासुलकर यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते.त्यामुळे पुन्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यामध्ये महिला राज पुन्हा ग्रामपंचायतीवर आले असल्याचे निदर्शनास येत आहे. महिला सक्षमीकरण तसेच महिला विकास होण्यासाठी महिलांना सक्षम होण्याची गरज दिसून येत आहे त्याच पावलावर पाऊल टाकत अश्विनी कृपाळे यांची सरपंच म्हणून निवड झाल्याने गावातील सर्वस्तरातून त्यांंचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. सामाजिक संघटना तसेच राजकीय संघटनांनी पाठबळ दिल्याने…

Read More

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वाहने, कारखाने व हरितगृहातून उत्सर्जित होणाऱ्या विषारी वायु, दूषित पाणी व किरणोत्सारांमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्लोबल वॉर्मिग, ऋतूमधील अनियमितता आणि तीव्रता वाढली आहे.त्यातच मानवाने जंगलतोड करून जमीन संपादित केली आणि त्यावर सिमेंंटची जंगले व कारखाने उभारले आहेत. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून धनाजी नाना महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक शिवाजी मगर यांनी वाढदिवसाच्या औचीत्याने वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला व दर वाढदिवसाला वृक्षारोपणाचा संकल्प सोडला. यासोबत संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, परिसर स्वच्छता व प्रदूषण विरहित वातावरणासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.प्रा. शिवाजी मगर यांनी…

Read More

फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे विद्यार्थी विकास विभाग आणि नगर परिषद फैजपूर यांंच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान कार्यक्रम साजरा करण्यात आला. फैजपूर नगरपालिकेचे अधिकारी दिलीप वाघमारे, संगिता बाक्षे, सुहास नेहेते, प्रसन्न डोलारे, टी. एन. चौधरी, प्रविण सपकाळे यांच्या हस्ते ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या शासनाच्या कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटनेचे पाईक असलेले १९३६ चे राष्ट्रीय ग्रामीण अधिवेशनाच्या भूमीतील माती घेण्यात आली. या ग्रामीण अधिवेशनाची आठवण देणारे धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या प्रांगणात उभारलेला ‘प्रेरणास्तंभ’ या इतिहास वास्तूला अभिवादन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.आय. भंगाळे, उप प्राचार्य…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी येथील स्थानिक विश्रामगृहावर उद्धव ठाकरे गट रेल्वे कामगार सेना तथा मलकापूर विधानसभा संपर्क प्रमुख ललित मुथा यांचे अध्यक्षतेखाली शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुकाप्रमुख दिपक चांभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ ऑगस्ट रोजी महत्वपूर्ण बैठक उत्साहात झाली. या बैठकीत गत सप्ताहात दि.१६ ऑगस्ट रोजी मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते खा.संजय राऊत,शिवसेना नेते खा.अनिल देसाई,रेल्वे कामगार केंंद्रीय अध्यक्ष तथा खा.विनायक राऊत आदींनी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संपर्क प्रमुख ललित मुथा, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, उपजिल्हा प्रमुख संजयसिंह राजपूत, मलकापूर शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुका प्रमुख दिपक चांंभारे, नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांंडव, शहरप्रमुख लालाभाऊ इंगळे…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी मुक्ताईनगरकडे आठ ते दहा संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याच्या गुप्त माहितीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल जाळे टाकून ईरटीका गाडी अडवून त्यातून आठ जणांना ताब्यात घेऊन अटक केली असून त्यांच्याजवळ एक गावठी कट्टा, सुरा व ६९ हजार रुपये रोख तसेच मोबाईल मिळून आले असून त्यांंच्यावर मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना गुरूवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवर घडली . दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की , राजकुमार सी.पोलीस अधिक्षक जळगाव, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे मुक्ताईनगर यांनी वेळोवेळी नाकाबंदी करणे, सराईत गुन्हेगार तपासणी करणेबाबत आदेश/सुचना…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी ३० वर्षांचा तरुण देवळात आला मात्र देवाच्या डोक्यावर माथा टेकण्याआधीच त्याच्यावर मृत्यू ओढावला आहे. मुलुंडमधील देवळात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी ही घटना घडली असून निमीश भिंडे असे या तरुणाचे नाव आहे. निमीश भिंडे हे व्यवसायिक असून त्यांचे मोबाईलचे दुकान होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमीश मुलुंड येथील एलबीएस मार्गावर असलेल्या बाल राजेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. श्रावणातील उपवास सोडायच्या आधी ते संध्याकाळी देवाच्या दर्शनासाठी आले होते मात्र पावसात भिजल्यामुळे ते थोडे ओले झाले होते आणि मंदिरातील जमीनदेखील ओली होती. त्याचवेळी अंगावरील ओले…

Read More

पाटणा ः राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहार सरकारमधील वनमंत्री तसेच पर्यटनमंत्री तेज प्रताप यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओ २२ ऑगस्टचा आहे. हा व्हिडीओ सेलार कला गावातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंत्री तेज प्रताप यादव संतापून एका तरुणाचा चक्क गळा पकडताना दिसत आहेत. त्यानंतर तेज प्रताप या तरुणाला धक्का देऊन दूर लोटतानाही दिसत आहेत. कारण अस्पष्ट प्राप्त माहितीनुसार, तेज प्रताप यादव यांनी ज्या तरुणाला धक्का दिला त्याचे नाव सुमंत यादव असे आहे. सुमंत हा पक्षाचा कार्यकर्ता आहे. सुमंत यादव गोपालगंज जिल्हा केसरी स्पर्धा जिंकणारे…

Read More