शानभाग विद्यालयात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

0
11

शानभाग विद्यालयात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या थोर नेत्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना या थोर नेत्यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील , विभाग प्रमुख रुपाली पाटील , स्वप्निल पाटील , जगदीश चौधरी आदींचे हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सकाळ विभागात या कार्यक्रमाचे निमित्ताने विद्यालयातील शिक्षक गुलाबराव पाटील , सचिन पाटील यांनी तसेच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल अनमोल अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी महात्मा गांधी यांचे बालपण, शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान आणि त्यांचे सामाजिक कार्य या विषयी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती सांगितली.

दुपार विभागात या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला डे-बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. सूत्रसंचालन विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले. यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौ.अनुराधा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेविषयी पथनाट्य सादर केले. तसेच विद्यालयातील 5 वी ते 7 वीच्या डे-बोर्डिंगच्या एकूण 21 विद्यार्थ्यांनी माझे सत्याचे प्रयोग या महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचे अभिवाचन केले. यात बॅरिस्टर गांधी, दांडी सत्याग्रह, असहकार चळवळ, चलेजाव आंदोलन, बालपण, शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान आणि त्यांचे सामाजिक कार्य या विषयावर विद्यार्थ्यांनी अभिवाचन केले.

या प्रसंगी विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख रुपाली पाटील, स्वप्निल पाटील , विद्या समिती प्रमुख जगदीश चौधरी यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख यांचे सोबत सर्व शालेय परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here