शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची ५० हजार रुपये एकरी मदत द्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी

0
12

शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची ५० हजार रुपये एकरी मदत द्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

सतत बरसणाऱ्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची मदत एकरी ५० हजार रुपये द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शासनामार्फत जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपयाची मदत त्वरित देण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगरचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावर्षी जुलै महिन्यापासून सतत मुसळधार व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे . यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे कपाशी, ज्वारी, केळी, सोयाबीन, मका व इतर पिके जमीन दोस्त झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून नेला आहे. मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे जमिनीचा कस वाहुन गेला. मका, ज्वारी, कापूस, सोयाबीन व इतर पिकास कोंब फुटले. पिके वादळी पावसामुळे जमिनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल, हतबल, निराश झाला आहे.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्हीजेएनटी विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, संजय चौधरी पाटील प्रभारी अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस इंटक उत्तर महाराष्ट्र विभाग, बी.डी.गवइ उपाध्यक्ष जळगाव जिल्हा काँग्रेस मागासवर्गीय सेल, शेख भैय्या शेख करीम अध्यक्ष अंतुर्ली शहर काँग्रेस, ज्योती धामोळे महिला काँग्रेस अध्यक्ष मुक्ताईनगर, संजय धामोळे, प्रा.सुभाष पाटील अध्यक्ष सेवादल काँग्रेस, बाळासाहेब पाटील, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here