दुर्गा नगर यंदा साजरा करणार अमृत महोत्सवी वर्ष

0
14

अध्यक्षपदी योगेश ढगे तर उपाध्यक्षपदी रविराज शिंदे यांची निवड

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

दुर्गा नगर येथील नवदुर्गा देवी महोत्सवाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी योगेश ढगे, उपाध्यक्षपदी रविराज शिंदे, कोषाध्यक्षपदी विनोद गायकवाड यांची सर्वानुमते निवड केली आहे. यंदा मंडळाला ७५ वर्ष पूर्ण होत असून मंडळ हे वर्ष अमृतमोहत्सवी वर्ष म्हणून साजरे करणार आहे.

दुर्गानगरच्या मुख्य मार्गावर स्थापित असलेल्या मंडळाची वैशिष्ट्ये म्हणजे डिजे, आणि बँडसारख्या ध्वनी प्रदूषण करणारे वाद्यांना बाजुला ठेऊन अनेक वर्षांची परंपरा जोपासत आगमन सोहळ्याला लेझीम पथक आणि अग्नीचा भवरा हे मंडळाचे आकर्षण ठरत असते. यंदा १० फुट उंच अशी आकर्षक देवीची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या १५ दिवस आधीपासून लेझीमचा नियमीत सराव सुरू झालेला आहे. जवळपास १५० ते २०० तरूण लेझीम पथकात सहभागी आहेत.

सर्वच सदस्य अति उत्साहात लेझीम खेळण्यासाठी सहभागी होत असतात.मिरवणुकीत आणि शहरातील मुख्य चौकात लेझीमचे सादरीकरण करण्यात येते. मागील अनेक वर्ष नवदुर्गा लेझीम मंडळाला उत्कृष्ट लेझीम पथक म्हणून बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे. बोदवड, जामनेर या शहरी भागात नवदुर्गा लेझीम पथकाने आपली कला सादर केलेली आहे.पथकाचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षांला विविध सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अनेक उपक्रम मंडळाच्यावतीने राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here