बोदवड पं.स.च्या माध्यमातून गरजूंसाठी राबविली योजना साईमत/बोदवड/प्रतिनिधी येथे पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातर्फे तालुक्यातील पाच दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलींचे वाटप नुकतेच करण्यात आले. २०२२-२३ या वित्तीय वर्षात स्वतंत्र दिव्यांग निधीतून दिव्यांगांच्या कल्याणासाठी व पाच टक्के निधीतून बॅटरीचलीत सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यासाठी तालुक्यातील पाच लाभार्थीची निवड झाली होती. त्यात कोमल मोरे (शेलवड), नंदकिशोर पाटील (वरखेड खुर्द), जनार्दन गायकवाड (साळशिंगी), भारत निकम (कोल्हाडी) आणि जुनोना येथील कडू सोनवणे ह्या लाभार्थींचा समावेश होता. दिव्यांगांना सायकल वाटप करताना तहसीलदार अनिल वाणी, बीडीओ प्रदीप घांडे, नगराध्यक्ष आनंदा पाटील, विधान सभा क्षेत्र प्रमुख हितेष पाटील, नगरसेवक दिनेश माळी, गजानन खोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित…
Author: saimat
महिलांनी धार्मिक गीतांवर धरला ठेका साईमत/फैजपूर/प्रतिनिधी येथील कै. दयावती कन्हैयालाल वर्मा यांच्या स्मरणार्थ नवरात्रोत्सवानिमित्त संभाजी राजे दुर्गोत्सव मित्र मंडळ, साई ग्रुपतर्फे माता जागरण व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात बऱ्हाणपूर येथील रोशनी चांदवानी, विशाल उंद्कारे यांच्यासह त्यांच्या इतर मंडळींनी कार्यक्रमास उपस्थिती देऊन माता रानी यांची भक्ती गीत व इतर भक्ती गीत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अतिशय सुंदर अशा धार्मिक कार्यक्रमांवर गीता सादर करून महिलांनी गीतांवर ठेका धरला. यावेळी अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, खंडोबावाडी देवस्थानचे गादीपती पवन दासजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती. त्यासोबत…
विविध सुविचारांसह अभिनंदनाच्या घोषणांचे तयार केले होते फलक साईमत/चोपडा/प्रतिनिधी ‘माझ्या मऱ्हाटीचे बोलु कौतुके, अमृतातेही पैजा जिंके’, अशी थोरवी असणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गेल्या अनेक वर्षापासून असलेली मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर करत सकल मराठी मनांना आनंद दिला आहे. भारत सरकारच्या निर्णयाचे येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून झालेले विविध स्तरावरील प्रयत्न, हा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेचा गौरव कसा वाढेल, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माय मराठी महाराष्ट्र शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील…
भोळे महाविद्यालयाला क्रॉस कंट्री पुरुष स्पर्धेत मिळाला तृतीय क्रमांक साईमत/भुसावळ/प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा पाल रावेर येथे नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय क्रॉस कंट्री पुरुष संघाने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत १० कि.मी. धावणे अंतर पाल ते गारखेडा व परत पाल असे पूर्ण करून अर्जुन बोयत, उदय पाटील, आशिष वाघ, अजय वानखेडे, पूर्वेश सोनवणे, तुषार नरवाडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. खेळांडूंना प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.खेळांडूंच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
चालकासह चार प्रवासी गंभीर जखमी साईमत/मलकापूर/प्रतिनिधी मलकापूर-बुलढाणा मार्गावरील मुंदडा पेट्रोलपंपाजवळ अज्ञात ट्रॅक्टरने रिक्षाला उडविल्याने रिक्षामधील चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. मलकापूर येथून प्रवासी घेऊन उमाळी जात असलेल्या रिक्षाला (क्र.एमएच २८ टी २८०४) अज्ञात ट्रॅक्टरने उडविल्याने रिक्षातील चालकासह चार प्रवासी जखमी झाले आहे. त्यापैकी तीन प्रवाशांना पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे. मलकापूर मार्गावरून वाळू वाहतूक सुसाट सुरू आहे. उमाळी जात असलेल्या रिक्षाला ट्रॅक्टरने धडक देऊन पसार झाल्याची घटना घडली. यावेळी स्थानिक नागरिकांनी जखमी प्रवाश्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे. रिक्षा चालक राजेंद्र गिरी (वय ४५) हा गंभीर…
गळफास घेऊन संपविले जीवन साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी, ६ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गुणवंत उत्तम गिते (वय २९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो वडील, भाऊ यांच्यासोबत शेती करत होता. दरम्यान, जामनेर तालुक्यातील लोंढरी बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या घडलेेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी साडे आठ वाजेच्या सुमारास त्याने जामनेर रस्त्यावरील सोनाळा शिवारातील हॉटेल मॉ कमल हॉटेलच्या पाठीमागील बाजूस एकनाथ गाडे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास…
सर्व शाळेतील सर्व शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचे कौतुक साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रात कार्यरत, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्या लोहारा-कुऱ्हाड गटातील सर्व माध्यमांच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, केंद्र प्रमुख अशा ३८ शिक्षकांना ‘उपक्रमशील शिक्षक’ गौरव पुरस्काराने सन्मानचिन्ह, गौरवपत्र देऊन भाजपा, पंचायत राज ग्रामविकास विभाग पदाधिकाऱ्यांच्यावतीने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सोनार, सुनील क्षीरसागर, कैलास चौधरी, रमेश शेळके, किसन पाटील, चंद्रकांत पाटील, शिवराम भडके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे, डॉ.प्रितिष चौधरी यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभागातर्फे कार्यक्रम घेण्यात आला.…
गौरवार्थींच्या चांगल्या कार्याची नोंद घेत मान्यवरांनी केले कौतुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तमरित्या कार्यरत डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्त्यांच्या चांगल्या कार्याची नोंद घेत त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्यासाठी सारांश फाउंडेशनतर्फे रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयात समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा आयएमए असोसिएशनच्या सचिव डॉ. अनिता भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, जळगाव महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यासह सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे यांची उपस्थिती होती. यांचा होता गौरवार्थींमध्ये समावेश वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी सत्कारार्थी डॉ.लीना पाटील, डॉ.कोमल सरोदे, डॉ.मोना बोरोले, डॉ.वृषाली पाटील, डॉ.कविता आडिया,…
८ ऑक्टोंबरपासून परीक्षा सुरू होणार साईमत/यावल/प्रतिनिधी परीक्षा २ दिवसांवर आली असली तरी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी म्हटले आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षा मंगळवारी, ८ ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे. परंतु त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र हॉल तिकीट अद्यापही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले नाही. विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड होत नाही. पर्यायी परीक्षा प्रक्रियेत कॉलेज, विद्यापीठ प्रशासनाची चूक विद्यार्थ्यांना महागात पडू शकते. त्यात त्यांचे शैक्षणिक, आर्थिक, मानसिक सर्वच प्रकारचे नुकसान झाल्यास त्या महाविद्यालय व विद्यापीठ कारणीभूत राहील. यासंदर्भात जळगाव जिल्ह्याचे रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी…
परिवर्तन महाशक्ति सोबत चर्चा करुन उमेदवारांचे नाव प्रसिद्ध करणार साईमत/मलकापूर/प्रतिनिधी बुलढाणा येथे शेतकरी संघटना समर्पित स्वतंत्र भारत पक्षाची जिल्हा कोअर कमेटीची आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत परिवर्तन महाशक्ति नेतृत्त्वाकडे स्वतंत्र भारत पक्ष बुलढाणा जिल्ह्याच्या चार जागा निवडणूक लढण्यासाठी मागणार आहे. त्यात मलकापूर, सिंदखेडराजा, चिखली आणि बुलढाणा या जागेचा समावेश आहे. चारही जागांवर लढण्यासाठी लवकरच परिवर्तन महाशक्ति सोबत चर्चा करुन उमेदवारांचे नाव प्रसिद्ध करण्यात येतील. परिवर्तन महाशक्तिचे सामूहिक नेतृत्व स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजी राजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी, प्रहार संघटनेचे बच्चु कडु, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकर धोंडगे आणि भारतीय किसान जवान पक्षाचे…