Author: saimat

मुक्ताईनगर प्रतिनिधी : ग्रामसभा न घेणे, पदाचा दुरुपयोग करणे आदी कारणांवरून काकोडा (ता.मुक्ताईनगर) ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना पदावरून अनार्ह (अपात्र ) ठरविण्यात आलेले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३ ऑगस्ट रोजी काढलेला आहे. कांबळे हे २०२१ पासून काकोडा ग्रामपंचायतचे सरपंच होते. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ नुसार सरपंच तुळशीराम कांबळे यांनी ग्रामसभेच्या बैठका घेतल्या नाहीत. तसेच तीन वर्षात केवळ एकच ग्रामसभा घेतली. सरकारी पैशांचा गैरवापर, ग्रामनिधी तसेच विविध योजनांचा निधीचा गैरवापर, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर, सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच बोगस बिले काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात…

Read More

अजित पवारांकडून अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकासावर भरीव तरतूद मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आपला ११ वा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष २०२५ – २६ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद…

Read More

शिवजयंतीत जिल्हाधिकाऱ्यांचा भूतदये’चा प्रत्यय येतो तेव्हा… जळगाव। विशेष प्रतिनिधी जळगाव शहरात बुधवारी  छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी होत असतांना, रथावर निघालेली मिरवणूक सर्वत्र उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण… अचानक रथाला जुंपलेल्या घोड्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे लक्ष वेधले जाते. रथाला जुंपलेला घोडा काहीसा अस्वस्थ त्यांना वाटला. त्यांनी घोड्याजवळ जावून त्याचे निरीक्षण केले, पशूवैद्यकीय डॉक्टरांना ही त्यांनी घोड्याच्या प्रकृतीची माहिती घेण्याविषयी सांगितले. पशूवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केली असता घोडा आजारी असल्याचे निष्पन्न झाले.  तातडीने घोड्यावर उपचार करण्यात आले आणि रथातून घोड्याला वेगळे केले. ही घटना किंवा हा प्रसंग ‘ भूत दया परमोधर्म याची प्रचिती आणून देणारा ठरला. भारतीय संस्कृतीत ‘भूतदया परमो धर्माचे…

Read More

महाराष्ट्र ई-स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिपचे उद्घाटन पुणे ( प्रतिनिधी) – केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज महाराष्ट्र ई-स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिपचे उद्घाटन करताना त्याला ऐतिहासिक टप्पा म्हणून संबोधित केले. ही चॅम्पियनशिप एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित केली आहे, जी राज्याच्या क्रीडा इतिहासातील आणि देशाच्या वाढत्या ई-स्पोर्ट्स उद्योगात महत्त्वाचा टप्पा ठरते. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी पुण्यातील भाषणात सांगितले की, ई-स्पोर्ट्समध्ये केवळ उत्तम तांत्रिक कौशल्यच नाही, तर मानसिक दृढता, जलद निर्णय क्षमता आणि संघभावना आवश्यक आहे, जे पारंपारिक क्रीडांमध्ये देखील आवश्यक आहेत.२०१८ च्या जाकार्ता-पलंबांग आशियाई क्रीडा स्पर्धेत एक डेमो क्रीडा म्हणून ई-स्पोर्ट्सचा समावेश झाला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने…

Read More

जय शिवराय, जय भारत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन जळगाव ( प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती१९ फेब्रुवारीरोजी साजरी करण्यात येत आहे. जळगाव शहरात जिल्हास्तरीय जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या वतीने देशपातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जय शिवराय, जय भारत पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही पदयात्रा सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होईल. पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल -कोर्ट चौक – पंडित जवाहरलाल नेहरु स्मारक – डॉ. बाबासाहेब अंबेडकर स्मारक – टॉवर चौक – चित्रा टॉकिज – शिवतीर्थ असा राहणार आहे.…

Read More

सहयोग कॉलनी पिंप्राळा परिसरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता   जळगाव – शहरातील सहयोग कॉलनी पिंप्राळा परिसरात कै.रविंद्र बाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त इस्कॉनच्या सहयोगाने पाटील परिवारातर्फे आयोजित सात दिवसीय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ उत्साहात पार पडला. श्रीमद भागवत कथा प्रवक्ता श्रीमान उद्धव प्रभुजी (भागवत शास्त्री, वृंदावन) होते. कथेचे आयोजन दि.११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनन जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, इस्कॉन जळगावचे अध्यक्ष पार्थसारथी प्रभुजी, श्रीमान चैतन्य जीवन प्रभुजी, आदित्य वामनदास, उत्तम मोहन दास, डॉ.माधव दास व समस्त पिंप्राळा हरे कृष्ण भक्त उपस्थित होते. शेवटी मधुर कीर्तनाने कथेची सांगता झाली. कथा कै.रविंद्र पाटील यांच्या…

Read More

सौर पंपासाठी १५ दिवसात विज जोडणी; शेंदुर्णी परिसरातील चित्र बदलविणार शेंदुर्णी , ता. जामनेर । प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दी शेंदुर्णी सेकंडरी को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता…

Read More

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीकडून उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार देणार जळगाव (प्रतिनिधी )- सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात १६ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त पूर्वतयारीसाठी विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली हाउसिंग सोसायटी हॉल येथे बैठकीचे आयोजन केले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीकडून यंदा उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणुन प्रतिभाताई शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. २० वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. सामाजिक ऐक्य, शिवाजी महाराजांचा इतिहास याबाबत बौद्धिक प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे केले जाते . यावर्षीही शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रम राबवण्याचे निर्णय घेण्यात आले. यावर्षी 18 फेब्रुवारीरोजी सायंकाळी…

Read More

आरोपीच्या सुटकेसाठी पथकावर हल्ला करीत पोलिसालाच डांबले जळगाव ( प्रतिनिधी ) — गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधात चोपडा ग्रामीण पोलीस गेले असता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काहीजणांकडून पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्याची घटना चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत उमर्टी इथे घडली. हल्ल्यानंतर एका पोलिसाला डांबून ठेवण्यात आले, मारहाणीत सहायक पोलिस निरीक्षकासह दोन जण जखमी झाले आहेत. चार तासांच्या थरारानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला सुखरुप परत आणण्यात पोलिसांना यश आले या घटनेने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांचेच अपहरण होऊन डांबून ठेवण्याचा प्रकार होत असेल तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे…

Read More

डॉ. होमी भाभा स्पर्धा परीक्षेत प्रसाद कुलकर्णीचे यश जळगाव ( प्रतिनिधी) – विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयातील इ 6 वीतील विद्यार्थी प्रसाद संदीप कुलकर्णी याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट या फेरीसाठी नामांकन प्राप्त केले आहे. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा भारत सरकारच्या शास्त्र आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चद्वारे आयोजित केली जाते. ही परीक्षा विज्ञान आणि गणितामध्ये प्रगती करणाऱ्या बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना शोध, संशोधन आणि नवीन विचारांचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करते. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर संशोधन व आवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणे. त्यांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक…

Read More