Author: saimat

अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष दिले. साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :   विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील दिव्यांग बांधवांंनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर केलेले उपोषण संबंधित अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. तालुक्यातील शिंदाड येथील काही दिव्यांग बांधवांनी त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. या उपोषणामुळे प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष दिले. उपोषण स्थळी पाचोरा प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, गटविकास अधिकारी सुधाकर मुढे, पिंपळगाव-शिंदाड गटातील माजी जि.प. सदस्य व भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, विस्तार अधिकारी ए.…

Read More

धार्मिक वातावरणात त्रिवेणी कार्यक्रमांची मांदियाळी साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :   मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्तात्रय प्रभू जन्मोत्सवाचे औचित्य साधत श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा तपपूर्ती वर्धापन दिन, श्री दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव आणि तथास्तु पंचअवतार उपहार असा त्रिवेणी संगम असलेला भव्य सोहळा संताजी नगर, मलकापूर येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळी ५ वाजता अधिष्ठानास मंगलस्नान घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गीता पठण, पारायण आणि सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. आचार्य प्रवर आणि माजी प्राचार्य राजधर शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित धर्मसभेत महान तपस्विनी पोमाईसा सभामंडपात महानुभाव पंथाची तत्त्वज्ञान परंपरा, समाजप्रबोधनातील योगदान आणि धर्ममार्गदर्शनाचे महत्त्व यावर सखोल विवेचन करण्यात आले.पंथाचा ध्वज शांती आणि…

Read More

ढोल-ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाचा मंगलमय नाद, कलशधारी महिला, निशानदारी पुरुष, लेझीम पथके,सजीव देखाव्यांसह  पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :  सावदा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळा सोमवारी दि.१५ रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृहासमोर आयोजित केला आहे.सकाळी ९ वाजता ढोल-ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाचा मंगलमय नाद, कलशधारी महिला, निशानदारी पुरुष, लेझीम पथके आणि विविध सजीव देखाव्यांसह रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर पादुकांना संत पिठावर विराजमान करून स्वागत आरती आणि विविध मंत्रघोषाने पूजन करून विशेष अध्यात्मिक प्रवचन होणार आहे. तसेच भाविकांसाठी उपासक दिक्षा आणि गुरूपूजन संपन्न होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दिक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी, असे…

Read More

आरोग्य शिबिर,भोजनदान,पुस्तक वाटपाचा उपक्रम  साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :  भारतीय बौद्ध महासभेचे मलकापूर शहराध्यक्ष आनंद तायडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘द पीपल सामाजिक बहुउद्देशीय संस्था, मुंबई’ यांच्यातर्फे भाविकांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले. तसेच समाजाच्या बौद्धिक उन्नतीसाठी बुद्धा आणि त्याचा धम्म, भारतीय संविधान, संविधान प्रस्ताविका तसेच बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर आणि विविध महापुरुषांच्या चरित्रग्रंथांचे मोठ्या प्रमाणावर मोफत वाटप करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत “द पीपल्स बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अमर कुमार तायडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची टीम सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. यावर्षीही त्यांनी चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण केले. त्यानंतर संकल्प नेशनल मेडिकल…

Read More

बनावट घरकुलांवरून चौकशीची मागणी तीव्र साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :   प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या घरकुल बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याची गंभीर चर्चा ग्रामीण जनतेत रंगू लागली आहे. सरकारी कागदोपत्री कामे जलद गतीने सुरू असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात काही गावांमध्ये घरकुलाचे काम न सुरू होता देखील संपूर्ण रक्कम लाभार्थ्यांना मिळाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. घरकुल योजनेचा उद्देश गोरगरिबांना सक्षम घर उपलब्ध करून देणे हा असताना, काही गावांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी, शिपाई तसेच संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट तपासण्या करून मंजुरी मिळविल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात बांधकाम नसतानाही काही ठिकाणी घरांचे फोटो काढून प्रस्ताव मंजूर करून घेतल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले…

Read More

माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात — व्हॉट्सअॅपद्वारे जमा ६४ हजार साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील भुसावळ रोडवरील अंबिका गॅरेजला ४ डिसेंबर रोजी रात्री उशिरा भीषण आग लागून संपूर्ण गॅरेज जळून खाक झाले. यात दुकानमालक भगवान रामदास निरखे यांचे अंदाजे २० ते २२ लाखांचे नुकसान झाले असून दहा वर्षांपासून उभा केलेला व्यवसाय क्षणात राख झाल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट झाले असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आहे. आगीत गॅरेजमधील उपकरणे, साहित्य, सुटे पार्टसह सर्व मालमत्ता नष्ट झाले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या आठ युवकांचा रोजगारही या आगीत बाधित झाला असून व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी किमान पाच…

Read More

दीप प्रज्वलन करून ‘भगवद्गीता’ या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. साईमत/फैजपूर/प्रतिनिधी : गीता जयंतीनिमित्त कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयात आयोजित भाषण स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका हिमाताई चौधरी होत्या.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ‘भगवद्गीता’ या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गीता जयंतीनिमित्त भाषणे दिली. इयत्ता ५ ते ७ या गटातून प्रथम क्रमांक राधिका ठाकूर, द्वितीय देवेश्री बोरोले, तृतीय रुही भावसार तसेच इयत्ता ८ ते १० या गटातून प्रथम क्रमांक शर्वरी महेश्री, द्वितीय अथर्व नेहते, तृतीय श्रद्धा गालफाडे या विद्यार्थ्यांनी मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भगवतगीता बक्षिस म्हणून देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी दैवी…

Read More

२५ पैकी ९ कोटी प्राप्त; उर्वरित निधी लवकरच देण्याचे मंत्र्यांचे आश्वासन साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिराचा विकास प्रकल्प गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेत अडकलेला आहे. सन २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १०० कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांना मंजुरी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ ९ कोटी रुपयांचा निधी आजपर्यंत उपलब्ध झाला असून उर्वरित निधी मिळालेला नाही. निधीअभावी मंदिराचे काम थांबले असून आजही संत मुक्ताई मंदिर कळसाविना उभे आहे. २०१८ नंतर शासनाकडून एकाही रुपयाचा निधी प्राप्त झाला नसल्याने प्रकल्प पूर्णतः रखडला आहे. मंदिराच्या कळसापासून ते प्रमुख बांधकामांपर्यंत अनेक कामे अपूर्ण असून भक्त…

Read More

यशोधाम पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंनी चमक दाखवत संघाला दिला राष्ट्रीय विजेतेपदाचा मान साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : भारतीय पेसापोलो संघटना आणि पेसापोलो फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ८ डिसेंबरदरम्यान भुसावळ येथील सेंट अलायसेस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झालेल्या १६ व्या पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. देशभरातील विविध राज्यांच्या संघांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने दमदार प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले. या राष्ट्रीय स्पर्धेत मलकापूर येथील यशोधाम पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली होती. ध्रुव शरद काळे, रुद्र अनंता महाजन, प्रेम गणेश उज्जैनकर, सिद्धार्थ संदीप तायडे, संस्कार महेंद्र जवरे आणि यश तुषार पाटील या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य…

Read More

 ८१० रुग्णांची तपासणी; २३० मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि जि.प.सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवारतर्फे आयोजित भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. पहाटेच नागरिकांनी शिबिरस्थळी मोठी गर्दी केली. सकाळी ७ वाजेपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि दिवसभरात ८१० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. पैकी २३० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होऊन त्यांना पनवेल येथील शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णांच्या नोंदणीपासून तपासणी, निदान आणि पुढील प्रक्रियेपर्यंत स्वतंत्र व्यवस्था शिबिरात उपलब्ध होती. उपस्थित प्रत्येकासाठी नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. संपूर्ण सेवा विनामूल्य दिल्याने…

Read More