Author: saimat

रहिवाशांची प्रशासनाकडे धाव साईमत/  मलकापूर/प्रतिनिधी : मलकापूर ग्रामीण येथील गजानन नगरी (सर्व्हे क्र.१९५/१) परिसरात सार्वजनिक रस्त्यावर उभारलेल्या टिनशेडच्या अतिक्रमणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. प्लॉट क्र.१४-ब व ७-ए येथील रहिवासी किर्ती अनिरुद्ध जाधव आणि प्रिती मदन रेळे यांनी ही तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार काही अज्ञात व्यक्तींनी सार्वजनिक रस्त्यात एमएसईबीच्या डीपीचे साहित्य वापरून अनधिकृत टिनशेड उभारले असून त्याठिकाणी विशिष्ट धर्माचे फोटो ठेवून पूजा-अर्चा व मोठ्या आवाजात वाद्य वाजविण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. यासाठी मुख्य विद्युत लाईनवरून बेकायदेशीररीत्या कनेक्शन घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या प्रकारामुळे परिसरात ध्वनीप्रदूषण वाढून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे. तसेच अतिक्रमणकर्त्यांना विरोध केल्यास…

Read More

दत्तजन्मोत्सव महाआरतीने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :  येथील जुने गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञा व आशिर्वादाने २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान अखंड नामजप, यज्ञ-याग, प्रहारे आणि सामूहिक गुरुचरित्र पारायणाचा उत्सव उत्साहात पार पडला. २८ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या सप्ताहाची भक्तिभावात सांगता करण्यात आली. सप्ताहभर दररोज सकाळी भूपाळी आरतीने दिवसाची सुरुवात होत होती. त्यानंतर सामूहिक गुरुचरित्र पारायण, १०.३० वाजता नैवेद्य आरती, गणेश याग, मनोबोध याग, स्वामी याग, गीताई याग, श्रीचंडी याग, मल्हारी व रुद्र याग असे विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. दुपारी १२.३९ वाजता नित्य स्वाहाकार, बळी पूर्णाहुती आणि दत्तजन्मोत्सव महाआरतीने परिसर…

Read More

फैजपूरमध्ये कोळी समाजातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन साईमत/ फैजपूर /प्रतिनिधी :   मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय यज्ञा जगदीश दुसाने या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन फैजपूर शहरातून आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे प्रांताधिकारी बबन काकडे यांना सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, यज्ञा दुसाने या तीन वर्षांच्या निरागस बालिकेवर नराधमाने अमानुष अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या केली. या राक्षसी कृत्याचा कोळी समाजाकडून जाहीर निषेध करण्यात आला असून, प्रशासनाने आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.…

Read More

सोनसाखळी चोरी प्रकरणातील दोन गुन्हे उघड; दोघांना अटक साईमत/  रावेर/प्रतिनिधी : रावेर पोलिसांनी जबरी सोनसाखळी चोरी प्रकरणात तत्पर व प्रभावी कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि.१ डिसेंबर रोजी शोभाबाई सुरेश पाटील या वाघोड येथील महिला रावेरहून वाघोडकडे जात असताना स्मशानभूमीजवळ दोन युवक लाल-काळ्या पल्सरवर आले आणि रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या चेहऱ्यावर माती फेकत गळ्यातील दहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जबरी तोडून पळ काढला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. निवडणुकीच्या तयारीदरम्यानच ही घटना घडल्याने पोलिसांनी प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने हाताळले. पोलीस…

Read More

जिल्हा परिषद मराठी शाळेतील निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी :    मोहरद या आदिवासी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. शाळेत नियुक्त असलेल्या चार शिक्षकांपैकी तब्बल तीन शिक्षक एकाच दिवशी रजेवर गेल्याने व शाळा वेळेवर उघडत नसल्याची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कबीर तडवी यांनी संतप्त होऊन शाळेला कुलूप ठोकले होते. हा प्रकार प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच शिक्षण विभाग तात्काळ जागा झाला. यासंदर्भात मंगळवार दि.२ रोजी सकाळी चोपडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील, अडावद बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी राजमल महाजन आणि केंद्रप्रमुख राकेश पाटील यांनी मोहरद शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या येण्यापूर्वीच दोन शिक्षक…

Read More

महिला कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा देत समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले. साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :  पाचोरा येथे आयोजित राज्यस्तरीय महिला सप्ताहा कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने भक्तीभावात उत्साहात पार पडला. सात दिवस चाललेल्या या सप्ताहात महाराष्ट्रभरातील नामांकित महिला कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा देत समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले.सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संस्थेच्या अध्यक्षा सुनिताताई पाटील यांनी सुश्राव्य, हृदयस्पर्शी कीर्तन सादर केले. कीर्तनातून त्यांनी समाजप्रबोधनात्मक अनेक मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या की, मंदिरात जाऊन पिंडीवर पाणी टाकण्यापेक्षा आपल्या घरातील दोन जिवंत देव सासू-सासरे यांची सेवा करा. त्यांच्या सेवेमध्येच खरा महादेव आहे.तसेच मुलींना जसे संस्कार देतो तसेच मुलांना देखील योग्य संस्कार देणे अत्यावश्यक आहे. मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवून…

Read More

भव्य धार्मिक कार्यक्रम नूतन शाळेजवळील राजा गणपती मंडळाच्या मैदानावर पार पडला. साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी  मलकापूर शहरात धार्मिक उत्साहाला नवीन उभारी देणारा ‘एक शाम खाटू वाले के नाम’ श्री श्याम बाबा भजन संध्या दरबार व भव्य युवा एकत्रीकरण’ हा भव्य धार्मिक कार्यक्रम नूतन शाळेजवळील राजा गणपती मंडळाच्या मैदानावर पार पडला. कार्यक्रम भक्तिमय आणि संगीतमय वातावरणात रंगला होता. तर उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि संपूर्ण मैदान भक्तीमय घोषणांनी आणि श्याम प्रेमाने दुमदुमून गेले. सुप्रसिद्ध धार्मिक गायिका कृतिकाजी राठोड यांनी आपल्या मधुर वाणीतील भजने सादर केली. त्यांच्या सुरेल सादरीकरणातून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात बाबा खाटू शाम यांची प्रतिमा उभारण्यात आली. ज्योत पेटवून…

Read More

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईमत/यावल/प्रतिनिधी :   यावल व रावेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कामकाज संदर्भात यावल व रावेर येथे प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची पूर्वतयारीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी यावल नगरपरिषद कार्यालयास भेट दिली. तसेच तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रुमची पाहणी केली. यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक मतदान केंद्रावर मतदारांसाठी दिल्या जाणाऱ्या सोईसुविधा, मतदान जागृती आदी विषयांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी घुगे यांनी यानंतर रावेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेतील उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज, मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. मतदानाच्या दिवशी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात त्यांनी प्रशिक्षणास उपस्थितांना सूचना दिल्यात.…

Read More

पतीच्या १७ वर्षे पाठपुराव्यानंतर राज्य ग्राहक आयोगाचे २६ लाख ५० हजार रुपये भरपाईचे आदेश साईमत/ पुणे/प्रतिनिधी :   पुण्यात सीझेरियन प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेच्या पोटात टॉवेल राहिला. यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला तीन वर्षे कोमात राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या पतीने १७ वर्षे न्यायासाठी लढा दिला अखेर राज्य ग्राहक आयोगाने रुग्णालय व डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणा आणि त्रुटीयुक्त सेवेसाठी जबाबदार धरलं रुग्णालय आणि डॉक्टरांना महिलेच्या पतीला २६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाषाण येथील प्रशांत कुकडे यांनी सूस रस्त्यावरील जीवनदीप मेडिकेअर सेंटर आणि डॉ. दीपलक्ष्मी रगडे यांच्या विरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यांची पत्नी रूपाली…

Read More

शेतात आढळले ठसे : वनविभागाकडून परिसराची पाहणी साईमत/धानोरा, ता. चोपडा/प्रतिनिधी :   धानोरा परिसरात पुन्हा एकदा वन्यजीवांच्या हालचालींनी शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी शेतात वाघाच्या पायांचे ठसे स्पष्टपणे आढळून आले असून वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी शुक्रवारी सायंकाळी वाघीणीचे दर्शन झाल्याचे सांगितल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी देवगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतरही धानोरा, पारगाव, देवगाव व मितावली शिवारात बिबट्या आणि वाघ यांच्या हालचाली सातत्याने दिसून येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शंका निर्माण होत आहेत. शुक्रवारी देवगाव रोडवर गणपत…

Read More