महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही जयंती उत्साहात व श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : येथील प्रताप महाविद्यालयात आज श्रीमंत प्रताप शेठ यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिचिन्हास व छायाचित्रास माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही जयंती उत्साहात व श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात निवडणूक उपसमितीचे चेअरमन पंडित रामचंद्र चौधरी, खान्देश शिक्षण मंडळाचे चिटणीस तथा उपप्राचार्य प्रा.पराग पाटील आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.डी.जाधव यांच्याहस्ते श्रीमंत प्रताप शेठ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. स्व.प्रताप शेठ हे परिसरातील शिक्षण, समाजकारण आणि दातृत्वासाठी ओळखले जाणारे दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम व परवडणारे…
Author: saimat
शेतकऱ्यांना हमीभावाचा दिलासा, खासगी व्यापाऱ्यांची पिळवणूक थांबणार साईमत/पारोळा/प्रतिनिधी : शहरात श्री बालाजी कोटेक्स जिनिंग ॲण्ड प्रेसिंग येथे भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या वतीने शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन आ.चिमणराव पाटील व नगराध्यक्षा नलिनी चिमणराव पाटील यांच्याहस्ते झाले. शासकीय कापूस खरेदी केंद्रामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस थेट शासनाच्या आधारभूत हमी किमतीनुसार खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. हा उपक्रम शेतकरी बांधवांच्या आर्थिक हितासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. उद्घाटनप्रसंगी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, ग्रेडर इंद्रप्रकाश लहाटा, सिद्धार्थ सिंग, श्री बालाजी कोटेक्स जिनिंग…
डॉ. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथ – डॉ. संजीवकुमार सोनवणे साईमत/धरणगाव/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सत्यशोधक समाज संघटनेतर्फे सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी, प्रख्यात समाजसेवक, समाजवादी विचारवंत व कामगार चळवळीचे प्रणेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांना अभिवादनपर आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्यशोधक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक करून डॉ. आढाव यांच्या समाजकार्यातील योगदानाचा वृत्तांत उपस्थितांसमोर ठेवला. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे व आदिनाथ दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांनी डॉ. आढाव यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. अभिवादनपर मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे म्हणाले, डॉ. बाबा आढाव…
प्रशासनाचे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप, तात्काळ कारवाईची मागणी साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील खरजई आणि तरवाडे शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम उत्खनन सुरू असून या उत्खननातून मिळणारा मुरूम डंपर आणि इतर भारी वाहनांद्वारे निर्बंधाविना वाहतूक केला जात असल्याची माहिती स्थानिकांतून पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्खननाचा वेग वाढत असून जेसीबीच्या सहाय्याने दिवसाढवळ्या सुरू असलेले हे काम पर्यावरणासह शेतीसाठी मोठा धोका ठरत आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही परवानगी नसताना होत असलेले हे उत्खनन सरळ बेकायदेशीर असून त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. मुरूमाचा खोलवर झालेला उपसा जमिनीची पातळी खाली बसण्याचा, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा तसेच भूक्षरण होण्याचा धोका निर्माण करत आहे. या अवैध…
चाकू–कोयत्यांनी मारहाण; रुग्णालयात तणाव, मोठी गर्दी साईमत/ धानोरा, ता. चोपडा /प्रतिनिधी : लोणी (ता. चोपडा) येथे गोवंश कत्तलीची माहिती मिळाल्यानंतर तपासासाठी गेलेल्या काही तरुणांवर स्थानिक कसाईंच्या गटाकडून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. हल्ल्यात कृष्णा भिल (१८, रा. जामनेर) आणि योगेश महाराज कोळी (३५, रा. जळगाव) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णा भिल याला लोणी गावात कथित गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती मिळताच तो योगेश कोळी आणि आणखी काही तरुणांसह तेथे पोहोचला. त्यांनी कत्तलीला विरोध करण्याचा प्रयत्न करताच काही स्थानिक कसाई कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत चॉपर, कोयते आणि लोखंडी दांडके…
विविध स्पर्धा, मोठी विद्यार्थी सहभागिता; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव साईमत/पारोळा/प्रतिनिधी/ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यातील बाहुटे येथील ग्लोबल मिशन स्कूलमध्ये आयोजित क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.महोत्सवाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख अतिथी पारोळा पोलिस उपनिरीक्षक विजय भोंबे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोहर पाटील, अरुण पाटील, यशवंत पाटील, अजय पाटील, राजेंद्र शर्मा उपस्थित होते. मशाल प्रज्वलनानंतर क्रीडा स्पर्धांना औपचारिक सुरुवात झाली. प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी लिंबू-चमचा, चेंडू शर्यत, धाव शर्यत तर ४ थी ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १०० मीटर धाव, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, संगीत खुर्ची, झिगझॅग धाव, गोळाफेक, जलतरण अशा विविध संघनिहाय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना…
शेतकऱ्यांसाठी शेती कर्ज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : तालुक्यातील अनुराबाद येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत एसबीआय कृषी विकास शाखा, मलकापूरतर्फे शेतकऱ्यांसाठी शेती कर्ज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्रीराम मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, कर्ज मर्यादा तसेच खातेविषयक विविध अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. एसबीआय कृषी विकास शाखेचे फिल्ड अधिकारी कमलेश तरोने व राहुल चित्ते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समजून घेत योग्य तो मार्गदर्शन केला. शेतकऱ्यांच्या कर्जाशी संबंधित अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाय सुचविण्यात आले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, शेतकरी बांधव आणि एसबीआयचे खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या…
आ. एकनाथराव खडसे यांची अधिवेशनात मागणी; नऊ वर्षांपासून प्रलंबित प्रकल्पाला गती देण्याची अपेक्षा साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यास मंजूर झालेले शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करावे, अशी मागणी विधानपरिषद सदस्य आ.एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनात केली. सन २०१६ मध्ये या महाविद्यालयास राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतरही नऊ वर्षांनंतरही प्रत्यक्ष सुरूवात न झाल्यामुळे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. आ.खडसे पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात पशूवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व मान्यता मिळालेल्या आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे या महाविद्यालयासाठी तब्बल ६० एकर जागा अधिग्रहित करून महाविद्यालयाच्या नावावरही करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर हे महाविद्यालय सालबर्डी येथे करायचे की जळगाव शहरात, असा प्रश्न उपस्थित होत असून…
नाकाबंदी दरम्यान दोन चोरीची वाहने जप्त साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर वाहतूक शाखेकडून केलेल्या नाकाबंदीत दोन संशयास्पद मोटारसायकली आढळून आल्या. त्वरित त्या वाहतूक शाखा कार्यालयात जमा केली. आरटीओमार्फत मोटारसायकलींच्या चेसिस आणि इंजिन क्रमांकांची पडताळणी करण्यात आली. तपासात या दोन्ही वाहनांना बनावट नंबर प्लेट लावल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या मोटारसायकलवर (एम.एच.१९ एएम १७६४) असा क्रमांक आढळून आला. परंतु तपासणी केल्यानंतर तिचा खरा क्रमांक (एम.एच.२१- बीएल २८३१) असून मालक सतीश दत्तात्रेय भवर (रा. संजय नगर, जुना जालना) असल्याचे निष्पन्न झाले. दुसऱ्या…
यात्रोत्सवानिमित्त परिसरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साईमत/भडगाव /प्रतिनिधी : तालुक्यातील वाक येथे दरवर्षीच्या प्रमाणे यावर्षीही शनिवार १३ डिसेंबर रोजी दत्तप्रभू यात्रोत्सव भरणार आहे. यात्रोत्सवानिमित्त परिसरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मंगल स्नान, सायंकाळी ५ वाजता आरती आणि पालखीचे सोहळा यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे लोकनाट्य-तमाशेही आयोजित केले जातात. यावर्षी दुपारी ४ वाजता तमाशाचा कार्यक्रम तर संध्याकाळी ७ ते ८ वाजता लोकनाट्य-तमाशाचे कार्यक्रम रंगणार आहेत. यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात लहान-मोठे पाळणे, संसार उपयोगी वस्तू, कटलरी आणि मिठाईच्या दुकाने देखील भरलेली असतात. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दुपारी २…